Sushant Case | सुशांत प्रकरणातील आरोपी संदीप सिंहने कोणत्या भाजप नेत्याला 53 कॉल केले? : सचिन सावंत
अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत (Sachin Sawant on BJP and Sandeep Singh connection).
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत (Sachin Sawant on BJP and Sandeep Singh connection). सुशांत प्रकरणातील संशयित आरोपी संदीप सिंहने भाजपच्या कार्यालयात 53 फोन केले. हे फोन संदीप सिंहने भाजपच्या कोणत्या नेत्याला केले? असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे. यावेळी त्यांनी संदीप सिंहचे भाजपशी जवळचे संबंध असल्याचं सांगत गुजरातमधील भाजपचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी संदीप सिंहच्या तोट्यातील कंपनीशी 177 कोटींचा करार केल्याचंही म्हटलं.
सचिन सावंत म्हणाले, “संदीप सिंहच्या कंपनीला 2017 मध्ये 66 लाख रुपयांचा तोटा, 2018 मध्ये 61 लाख रुपयांचा फायदा आणि 2019 मध्ये 4 लाख रुपयांचा तोटा झाला. असं असताना गुजरातमधील भाजपचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी संदीप सिंहच्या तोट्यातील कंपनीसोबत 177 कोटी रुपयांचा करार केला. त्याल हे पैसे कोणत्या मंत्र्याकडून मिळत होते. संदीप सिंहसोबतचा हा करार नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्यासाठीचं टोकन तर नव्हतं ना? गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी संदीप सिंहसोबत 177 कोटी रुपयांचा करार करण्याचा निर्णय कशाच्या आधारावर घेतला?”
#BJP ‘s blue-eyed boy Sandeep Ssingh’s company’s financials reflect a sorry story:
In 2017 – loss of ₹ 66 lakhs In 2018 – profit of ₹ 61 lakhs In 2019 – loss of ₹ 4 lakhs
Gujarat CM Rupani signed MoU with Sandeep in 2019 for ₹ 177 crs.
Who was he getting this money from? pic.twitter.com/M9qo2BGlwt
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 30, 2020
सचिन सावंत यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांचं एक ट्विट रिट्विट केलं आहे. यात सुरजेवाला यांनी भाजपवर अनेक प्रश्न डागले आहेत. ते म्हणाले, “सुशांत प्रकरणातील संशयित आरोपी संदीप सिंहने भाजप कार्यालयात 53 फोन केले. त्याने भारतीय दुतावासाने आयोजित केलेल्या मॉरिशस यात्रेत एका अल्पवयीन मुलीची छेडछाड केली. त्यानंतरही त्याला मोदींवर चित्रपट बनवण्याची जबाबदारी देण्यात आली. व्हायब्रंट गुजरात अंतर्गत त्याच्या कंपनीशी 177 कोटी रुपयांचा करार करण्यात आला. सीबीआय आरोपीच्या भाजपशी असलेल्या या नात्याची चौकसी करणार का?”
4) Ensuing Modi ji’s biopic, Sandeep SSingh’s Legend Global Studio was the only film company which signed MOU worth ₹177 crores with Gujarat govt in Vibrant Gujarat summit. Why only Sandeep’s company & not others? What makes him a blue eyed boy of BJP? https://t.co/bJRqjDmHdR pic.twitter.com/vEybLVXEin
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 29, 2020
सचिन सावंत यांनी भाजपवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसेच संदीप सिंहचा भाजपशी जवळचा संबंध असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता सुशांत प्रकरणावरुन काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मित्र आणि चित्रपट निर्माता संदीप सिंहचा भाजपशी नेमका संबंध काय, याबाबत तपास करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी सीबीआयला निवेदनही दिले आहे. संदीप सिंहने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मचरित्रावर चित्रपट बनवला आहे. त्याचबरोबर हा चित्रपट त्याने 27 भाषांमध्येही तयार केला आहे. त्यामुळे संदीप सिंहचे भाजप संबंध तपासा, अशी मागणी अनिल देशमुख यांनी सीबीआयकडे केली.
संबंधित बातम्या :
“संदीप सिंह मोदींच्या बायोपिकचे निर्माते, फडणवीसांसह मंचावर” सचिन सावंत यांचे भाजपकडे बोट
मुंबईत आईस्क्रीम विक्री, मीडिया हाऊस ते चित्रपट निर्मिती, सुशांत प्रकरणाशी संदीप सिंहचा संबंध काय?
Sachin Sawant on BJP and Sandeep Singh connection