Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपनेच मराठा आरक्षणविरोधातील न्यायालयीन लढाईला रसद पुरवून महाराष्ट्राशी दगाबाजी केली? : सचिन सावंत

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात विरोध करणाऱ्यांचा संबंध RSS शी असल्याचा आरोप करत भाजपनेच मराठा आरक्षणविरोधातील न्यायालयीन लढाईला रसद पुरवून महाराष्ट्राशी दगाबाजी केली? असा सवाल केलाय.

भाजपनेच मराठा आरक्षणविरोधातील न्यायालयीन लढाईला रसद पुरवून महाराष्ट्राशी दगाबाजी केली? : सचिन सावंत
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 4:21 PM

मुंबई :मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्या ‘सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन’ या संस्थेचे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे भाजप व राष्ट्रीयस्वयंसेवक संघाचे नागपूर कनेक्शन उघड झाले आहे. यात भाजप पदाधिकारीच अग्रेसर असल्याने मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत आरक्षण विरोधी लोकं व संस्थांना रसद पुरवून भाजपनेच मराठा समाजाशी दगाबाजी केली आहे का?” असा संतप्त सवाल काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय. तसेच जनतेची दिशाभूल करण्यासाठी 5 जूनला भाजप पुरस्कृत आंदोलनामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार उडाला, तर त्याला सर्वस्वी सुपर स्प्रेडर भाजप जबाबदार असेल, असा इशाराही सचिन सावंत यांनी दिला (Congress leader Sachin Sawant serious allegations on RSS BJP and Devendra Fadnavis about Maratha reservation).

“भाजपची मानसिकता संघ विचारधारेप्रमाणेच आरक्षण विरोधी”

सचिन सावंत म्हणाले, “भाजपची मानसिकता संघ विचारधारेप्रमाणेच आरक्षण विरोधी आहे. मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे असा दिखावा करायचा आणि प्रत्यक्षात मात्र आरक्षण मिळू नये म्हणून मोहिमा चालवायच्या ही भाजपची कार्यपद्धती आहे. याचे कारण असे की, सर्वोच्च न्यायालयात आरक्षणविरोधी लढाई लढणारे ‘सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन’ या संघटनेचे थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी कनेक्शन आहे. या संस्थेतील बहुसंख्य विश्वस्त हे आरएसएसशी संबंधित असून नागपूरचेच आहेत.”

“आरक्षणविरोधी याचिकाकर्त्याची फडणवीस आणि पाटलांकडून भाजप समन्वयकपदी नियुक्ती”

“याशिवाय भाजपच्या संघाच्या कार्यामध्येही ते अग्रेसर असतात याचेही पुरावे समोर आले आहेत. CAA कायद्याला पाठिंबा देण्यासाठी ही मंडळी भाजपच्या व्यासपीठावर होती. त्यापेक्षा गंभीर बाब ही की, या संस्थेचे संस्थापक डॉ. अनुप मरार हे भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे पूर्व विदर्भातील समन्वयक आहेत. त्यांनी स्वतःचा पत्ता या संस्थेचा पत्ता म्हणून नोंदवलेला आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनीच त्यांची समन्वयकपदी नियुक्ती केली आहे,” असंही सावंत यांनी नमूद केलं.

“मराठा आरक्षणाविरोधात मोर्चे काढूनही भाजपकडून मरार यांची नियुक्ती”

सचिन सावंत म्हणाले, “मुंबई उच्च न्यायालयात ही न्यायालयीन लढाई चालली होती त्यावेळी ही संस्था अस्तित्वात नव्हती. परंतु मुंबई उच्च न्यायालयात आरक्षणाच्या बाजूने निकाल लागल्यानंतर या संस्थेचे कामकाज सुरु झाले. ही संस्था प्रमुख्याने मराठा आरक्षण विरोधातच कार्यरत आहे असे कागदपत्रावरून दिसते. मराठा आरक्षण विरोधात 4 याचिकाकर्ते या संस्थेने पाठवले असे या संस्थेच्या वेबसाईटवर नमूद आहे. डॉ. अनुप मरार हे मराठा आरक्षणाविरोधात त्यांच्या सहकाऱ्याबरोबर नागपूरमध्ये मोर्चे काढत होते, तरीही भाजप पदाधिकारी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सदर संस्थेमार्फत नामवंत वकील मराठा आरक्षणाचा विरोध करण्यासाठी देण्यात आले होते.”

“डॉ अनुप मरार यांचे देवेंद्र फडणवीस याच्यासह अनेक भाजप नेत्यांशी संबंध आहेत. हे सर्व पाहता भाजपने मराठा आरक्षण विरोधात रसद पुरवून मराठा समाजाशी दगाबाजी केली का? याचे उत्तर दिले पाहिजे”, अशी मागणी सावंत यांनी केली.

“भाजपने आपल्या पदाधिकाऱ्याला मराठा आरक्षणाला विरोध करण्यापासून थांबवलं का नाही?”

“कोल्हापूर येथे सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या संस्थेच्या कारवायांविरोधात आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी घेतलेल्या आरक्षण विरोधी भूमिकेविरोधात मराठा समाजाच्या आंदोलकांनी मोठे आंदोलन केले. यातून या संस्थेची भूमिका आणि मराठा समाजाचा या संस्थेविरोधातील रोष किती मोठा आहे हे स्पष्ट होते. कोणी वैयक्तिक पातळीवर कोणत्याही प्रश्नावर न्यायालयात जाऊ शकतो, पण इथे भाजपचा पदाधिकारी हा भाजपच्या नीती नियमांशी बांधील असतो. मग भाजपने त्याला का थांबवले नाही? यांचे उत्तर मिळाले पाहिजे,” असेही सावंत म्हणाले.

“मोदी आणि फडणवीस सरकारमुळेच मराठा आरक्षणाला अडथळा निर्माण झाला”

सचिन सावंत म्हणाले, “भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि फडणवीस सरकार यांच्यामुळेच मराठा आरक्षणाला अडथळा निर्माण झाला हे स्पष्ट आहे. असं असताना भाजप जनतेची दिशाभूल करून आपल्या पापांचे खापर महाविकास आघाडीवर फोडण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठीच 5 जून रोजी भाजप पुरस्कृत आंदोलन केले जाणार आहे. भारतीय जनता पक्षाची ख्याती कोरोना सुपर स्प्रेडर म्हणून अगोदरच प्रस्थापित झालेली आहे.”

“महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढल्यास सुपर स्प्रेडर भाजपचं वर्तन जबाबदार”

“देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना 5 राज्यांच्या निवडणुकीत सत्तापिपासू वृत्तीने भाजपने मोठमोठ्या सभा व रोड शो केले. यातून कोरोनाचा प्रसार झाल्यानेच देशात कोरोनाचा हाहाकार उडाला. 5 जूनच्या आंदोलनानंतर जर महाराष्ट्रात कोरोनाचा भडका उडाला, तर त्याला सुपर स्प्रेडर भाजपचं वर्तनच जबाबदार असेल,” असा इशारा सचिन सावंत यांनी दिला.

हेही वाचा : 

‘पंतप्रधान मोदी आणि भाजपचे नेते मदत करत नसतील तर संभाजीराजेंनी खासदारकीचा राजीनामा द्यावा’

मोठी बातमी: मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे मनसेप्रमुख राज ठाकरेंची भेट घेणार

संभाजी छत्रपती आणि भाजपात मतभेद वाढतायत? पाटील म्हणतात, पक्षाने किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीयेत!

व्हिडीओ पाहा :

Sachin Sawant serious allegations on RSS BJP and Devendra Fadnavis about Maratha reservation

सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?.
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'.
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र.
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी...
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी....
'लाडकी बहीण'बाबत सरकारचा मोठा निर्णय, 'या' लाभार्थीना योजनेतून वगळणार
'लाडकी बहीण'बाबत सरकारचा मोठा निर्णय, 'या' लाभार्थीना योजनेतून वगळणार.
'ये दादा का स्टाईल है...', माझाच भाऊ माझ्या सोबत नाही -अजित पवार
'ये दादा का स्टाईल है...', माझाच भाऊ माझ्या सोबत नाही -अजित पवार.
'इतना हंगामा क्यों...', धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून सुरेश धसांचा सवाल
'इतना हंगामा क्यों...', धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून सुरेश धसांचा सवाल.
सुरेश धसांनी गेम केला की त्यांचाच गेम झाला? सापळा रचणारा व्यक्ती कोण?
सुरेश धसांनी गेम केला की त्यांचाच गेम झाला? सापळा रचणारा व्यक्ती कोण?.
ठाकरेंच्या भास्कर जाधवांची नाराजी उघड, उदय सामंतांची थेट ऑफर अन्...
ठाकरेंच्या भास्कर जाधवांची नाराजी उघड, उदय सामंतांची थेट ऑफर अन्....
'एक बार मैंने जो...', डायलॉगबाजीनं शिंदेंनी मानले कोकणवासियांचे आभार
'एक बार मैंने जो...', डायलॉगबाजीनं शिंदेंनी मानले कोकणवासियांचे आभार.