Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Vaze Case : बाळासाहेबांची आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे- अनिल परब

सचिन वाझे यांच्या लेटर बॉम्बमध्ये करण्यात आलेले आरोप परिवहन मंत्री अनिल परब यांनी फेटाळून लावले आहेत. आपण कुठल्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचं परब यांनी म्हटलंय.

Sachin Vaze Case : बाळासाहेबांची आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे- अनिल परब
परिवहन मंत्री अनिल परब यांनी सचिन वाझेंनी केलेले आरोप फेटाळले आहेत.
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 7:06 PM

मुंबई : परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्ब पाठोपाठ आता सचिन वाझे यांच्या लेटर बॉम्बमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझेंच्या या आरोपांना आता स्वत: अनिल परब यांनी उत्तर दिलं आहे. परब यांनी पत्रकार परिषद घेत सचिन वाझे यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच आपण कुठल्याही प्रकारच्या चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचंही परब यांनी म्हटलंय. (Transport Minister Anil Parab refutes Sachin Waze’s allegations, Claiming to be ready to face any inquiry)

अनिल परब यांनी आरोप फेटाळले

“दोन मुलींची शपथ घेतो, बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे आहेत. मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपचे नेते दोन तीन दिवसांपासून आरडा ओरड करत होते. आणखी एक बळी घेऊ म्हणत होते. म्हणजे हे प्रकरण आधीपासून माहिती होतं. सचिन वाझे आज पत्र देणार होता त्यामुळे तिसरी विकेट काढणार असं भाजपला आधीच माहिती होतं. एक आरोप माझ्यावर, एक अनिल देशमुख आणि एक आरोप अजित पवारांच्या जवळचा माणूस म्हणून घोडावत यांचं नाव घेण्यात आलं आहे”, असं परब यांनी म्हटलंय.

त्याचबरोबर ‘माझ्यावर जे दोन आरोप केले आहेत, त्याचा माझा संबंध नाही. अशी चौकशी सुरु आहे हे मला माहिती नाही. महानगरपालिकेच्या कंत्राटदाराशी माझी ओळखही नाही. त्यामुळे मी आज कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे, असंही परब म्हणाले आहेत.

अनिल परब नेमकं काय म्हणाले?

आज सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टात एक पत्र दिलंय. त्या पत्रात त्यांनी माझा उल्लेख केला आहे. मी सचिन वाझे यांना बोलावलं होतं, असं त्यांनी म्हटलं आहे. २०२० च्या जून, ऑगस्टमध्ये सचिन वाझे यांना एसबीयूटी प्रकरणामध्ये ट्रस्टींकडून 50 कोटी जमा करण्याचे आदेश मी त्यांना दिले, असा गंभीर आरोप वाझे यांनी पत्रात केला आहे. जानेवारी 2021 मध्ये मी मुंबई महापालिकेचा क्रॉन्ट्रक्टरकडून प्रत्येकी दोन कोटी जमा करण्याच्या सूचना दिल्या, असा दुसरा आरोप त्यांनी केलाय. या दोन्ही गोष्टी धादांत खोट्या आहेत. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवपसैनिक आहे. माझ्यावर अशाप्रकारचे खंडणीचे कुठलेही संस्कार नाही. म्हणून मी माझ्या दोन मुली आणि बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, हे सर्व खोटं आहे. हे मला नाहक बदनाम करण्यासाठी आरोप करण्यात आले आहेत.

‘केंद्रीय यंत्रणेला हाताशी धरुन भाजपचं षडयंत्र’

भाजपचे पदाधिकारी आरडाओरड करत होते. या प्रकरणात आम्ही तिसरा बळी घेऊ, असं ते म्हणत होते. याचा अर्थ त्यांनी दोन-तीन दिवसांपासून हे प्रकरण शिजवलं आहे. त्यांनी सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्रकरण तयार केलं आहे. सचिन वाझे पत्र देणार हे कदाचित त्यांना माहिती होतं. त्यामुळे केंद्रीय यंत्रणेला हाताशी धरुन त्यांनी आरोप केले आहेत. या पत्रात वाझेंनी माझ्यावर, अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचा माणूस म्हणून एकावर आरोप केले आहेत. पण त्याने केलेले दोन आरोपांशी माझा काहीच संबंध नाही. महापालिकेच्या कुठल्याही कंत्राटदारासी माझी ओळख नाही. त्यामुळे मी आज कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे.

‘मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला बदनाम करण्याची स्ट्रॅटेजी’

मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या मानसाला बदनाम करणं गरजेचं आहे, ही स्ट्रॅटेजी आहे. तसं करुन सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. हे प्रकरण जाणीवपूर्वक वेगवेगळ्या दिशेला वळवले जात आहे. मी नार्कोटिक्ससाठी देखील तयार आहे. ज्या शिवसैनिकांना माझ्यावर विश्वास आहे त्यांना मी असं कधीही करणार नाही हे सांगण्यासाठी मी पत्रकार परिषद घेऊन आपलं मत मांडत आहे.

संबंधित बातम्या :

EXCLUSIVE : अनिल देशमुखांनी 2 कोटी मागितले, सचिन वाझेंचा लेटरबॉम्ब, मविआच्या 3 मंत्र्यांवर गंभीर आरोप

सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची खलबतं; मविआ सरकार सीबीआय चौकशीच्या निर्णयाविरोधात दंड थोपटणार?

Transport Minister Anil Parab refutes Sachin Waze’s allegations, Claiming to be ready to face any inquiry

करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा.
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश.
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण.
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर.
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?.