तिकिटासाठी देवांना घातले साकडे, प्रचार केला, आता पुन्हा निघाले देवतांच्या आश्रयाला

| Updated on: Nov 27, 2023 | 12:03 AM

आपण केलेल्या कामासोबतच अपेक्षित निकालासाठी ग्रहसुद्धा अनुकूल असणे आवश्यक आहे. विजयाचा मुकुट परिधान करण्यासाठी ग्रहमानानुसार विजयाच्या मार्गातील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करत आहे असे एका उमेदवाराने सांगितले. ज्योतिषांना पत्रिका दाखविण्यात येत आहेत.

तिकिटासाठी देवांना घातले साकडे, प्रचार केला, आता पुन्हा निघाले देवतांच्या आश्रयाला
MADHY PRADESH ELECTION 2023
Follow us on

Madhya Pradesh Assembly elections 2023 | 26 नोव्हेंबर 2023 : विधानसभा निवडणुकीत तिकिट मिळावी यासाठी सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी देवी-देवतांन साकडे घातले. उमेदवारी मिळाली. जोमाने प्रचार केला. मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या. मतदानही झाले. पण आपण केलेल्या कामची पोच पावती मिळावी. आपणच जिंकून यावे यासाठी आता उमेदवारांनी पुन्हा एकदा देव देवतांचे दर्शन घेऊन त्यांच्या आश्रयाला जाण्यास सुरवात केलीय. आपण केलेल्या कामासोबतच अपेक्षित निकालासाठी ग्रहसुद्धा अनुकूल असणे आवश्यक आहे. विजयाचा मुकुट परिधान करण्यासाठी ग्रहमानानुसार विजयाच्या मार्गातील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करत आहे असे एका उमेदवाराने सांगितले. ज्योतिषांना पत्रिका दाखविण्यात येत आहेत. त्यांच्या सल्ल्याने गुरूला शक्तीशाली बनवण्यासाठी आणि शनीला शांत करण्यासाठी जप आणि अनुष्ठान केले जात आहेत असेही हा उमेदवार म्हणाला.

मध्यप्रदेशात पितांबर माई आणि धुमावती माई या ठिकाणी अनेक उमेदवार येवून गुपचूप धार्मिक विधी पार पाडत आहेत. तर, तारापीठावर मंत्रोच्चार आणि हनुमान मंदिरात अखंड ज्योती प्रज्वलित करण्यात येत आहेत. काही उमेदवारांच्या घरी ब्राह्मण आणि ज्योतिष अभ्यासक ये जा करताना दिसत आहेत. एकूणच आपल्या विजयासाठी उमेदवार सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसताहेत.

दातिया येथील प्रसिद्ध पितांबरा माई आणि धुमावती यांच्या चरणी विधी करण्यात येत आहेत. येथे विधी केल्याने शत्रूंचा पराभव होतो असे मानले जाते. त्यामुळेच येथे नेत्यांच्या नावाने नामजप आणि विधी केले जात आहेत. दुसरे स्थान बिर्ला नगर येथील तारादेवीचे आहे. या मंदिरातही नामजप आणि अनुष्ठान वाढले आहे.

हे सुद्धा वाचा

तिसरे सिद्ध ठिकाण म्हणजे रेल्वे स्थानक पुलाखाली असलेले मनशा पूर्ण हनुमान मंदिर. येथे वर्षानुवर्षे विराम न देता रामायणाचे पठण केले जाते. जेथे रामायण घडते आणि श्रीरामाचे नामस्मरण होते तेथे पवनपुत्र स्वतः उपस्थित असतात असे सांगण्यात येते. त्यामुळे जिल्ह्याच्या केंद्रीय मंत्री, मंत्री आणि आमदार यांची पूर्ण श्रध्दा या मंदिराशी जोडली गेली आहे. आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी उमेदवार या मंदिरात अखंड ज्योती प्रज्वलित करत आहेत.

घराघरांतही विधी होत आहेत.

देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी काही उमेदवारांच्या घरी कलशाची प्रतिष्ठापना करण्यात आलीय. नामजप आणि विधी करण्यात येत आहेत. उमेदवारांच्या पत्नीदेखील आपल्या पतीचे भाग्य सुधारावे यासाठी ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार पूजा आणि तपश्चर्या करत आहे. मतदारांनी या उमेदवारांना विजयाची खात्री दिलीय. पण, त्यांची मते ही मतपेटीत बंद झाली आहेत. मात्र, त्यांनी खात्री देऊनही ही त्यामुळे मते नक्की कुणाच्या पारड्यात टाकली आहेत याची धास्ती उमेदवारांनी घेतलीय. म्हणूनच हा आता उमेदवारांनी देवी देवतांचा आश्रय घेतल्याचे दिसून येत आहे.