ऐट राजाची, वागणूक भिकाऱ्याची अशी सरकारची अवस्था, ठाकरेंनी काढलेल्या GR ची होळी करणार : सदाभाऊ खोत

अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने कालच्या कॅबीनेटमध्ये 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. मात्र सरकारने जाहीर केलेलं पॅकेज अपुरं आहे. सरकारची ऐट राजाची आणि अवस्था भिकाऱ्याची आहे, अशी घणाघाती टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

ऐट राजाची, वागणूक भिकाऱ्याची अशी सरकारची अवस्था, ठाकरेंनी काढलेल्या GR ची होळी करणार : सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोत, उद्धव ठाकरे आणि अजित पवार
Follow us
| Updated on: Oct 14, 2021 | 3:39 PM

कोल्हापूर : अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने कालच्या कॅबीनेटमध्ये 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. मात्र सरकारने जाहीर केलेलं पॅकेज अपुरं आहे. सरकारची ऐट राजाची आणि अवस्था भिकाऱ्याची आहे, अशी घणाघाती टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

राज्यात यावर्षी अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्यावतीने 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांच्या मदतीबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

सरकारच्या GR ची होळी करणार

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महापूर आणि अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. अतिवृष्टीग्रस्तांसाठी लगोलग कोणतंही पॅकेज जाहीर करणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली होती. पण आत्ता त्यांनीच 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या GR ची 20 तारखेला मी होळी करणार असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.

ऐट राजाची, वागणूक भिकाऱ्याची अशी सरकारची अवस्था

ऐट राजाची, वागणूक भिकाऱ्याची अशी सरकारची अवस्था आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या शेतात गाढवाचा नांगर फिरविला आहे. लवकरच मी सरकार विरोधात किसान परिषद घेणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही परिषद घेणार आहे, असंही सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.

जलसमाधी नको कमीत कमी अंघोळ तरी करा, राजू शेट्टींना टोला

शेतकऱ्यांना योग्य ती मदत दिली नाही तर जलसमाधी घेईन, असा इशारा राजू शेट्टी यांनी सरकारला दिली होता. सदाभाऊंनी राजू शेट्टींना निशाण्यावर घेताना जलसमाधी नको किमान अंघोळ तरी करा, असा टोला लगावला. तर आतातरी शरद पवारांच्या माडीवरुन खाली उचरणार की नाही, असा खोचक सवालही विचारला.

ही तर तुटपुंजी रक्कम, ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली!- हर्षवर्धन पाटील

हर्षवर्धन पाटील यांनी सरकारच्या वतीने जाहीर केलेल्या पॅकेजबाबत नाराजी व्यक्त केली. ही मदत तुटपुंजी असल्याची टीका करत सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत, असं ते म्हणाले.  राज्य सरकारने जिरायती भागासाठी 10 हजार प्रति हेक्‍टर व बागायती भागासाठी 15 हजार रुपये प्रतिहेक्‍टर रुपये मदत जाहीर केली आहे.

मात्र, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे मोठ्या प्रमाणावर असून काही शेतकऱ्यांच्या जमिनी अक्षरशः खरवडून गेल्या आहेत. त्यात पुढील दोन वर्षे कोणतेही पीक घेता येणार नाही. अशा परिस्थितीत राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याची टीका पाटील यांनी केली. यावेळी राज्य सरकारने या मदतीवर पुनर्विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

(Sadabhau Khot Attacked Uddhav thackeray Government over Flood Affected Farmer Relief package)

हे ही वाचा :

अतिवृष्टीग्रस्तांसाठी ठाकरे सरकारकडून 10 हजार कोटींचं पॅकेज, हर्षवर्धन पाटील म्हणतात, ‘ही तर तुटपुंजी रक्कम!’

'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.