सत्तेत राहून आंदोलन करायचे, दुसऱ्या बाजूला बारामतीला जाऊन गोड चहा घ्यायचा, सदाभाऊ खोत यांचा घणाघात

हे उद्योग बंद करा," असा इशारा भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी दिला. (Sadabhau Khot Criticism Raju Shetti)  

सत्तेत राहून आंदोलन करायचे, दुसऱ्या बाजूला बारामतीला जाऊन गोड चहा घ्यायचा, सदाभाऊ खोत यांचा घणाघात
Raju Shetti Sadabhau Khot
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 9:43 PM

ठाणे : एकीकडे सत्तेत राहून आंदोलन करायचे आणि दुसऱ्या बाजूला राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या सोबत राहून आमदारकीसाठी बारामतीला जाऊन आमरस, गोड चहा घ्यायचा, अशी दुटप्पी भूमिका काही पक्षातील नेते करत आहेत. अशी घणाघाती टीका भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांचे नाव न घेता केली. (Sadabhau Khot Criticism Raju Shetti)

केंद्र सरकारने लागू केलेल्या कायद्याच्या समर्थनार्थ सदाभाऊ खोत यांनी ठाण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना खोत यांनी शेतकरी नेते राजू शेट्टींवर जोरदार टीका केली.

“लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र शेतकऱ्यासाठी आम्ही काम करतो असे खोट बोलून फक्त आमदारी मिळावी यासाठीचे प्रयत्न दिसून येत आहेत. एकाबाजूला सत्तेत राहून आंदोलन करायचे आणि दुसऱ्या बाजूला कारखाना मालकांच्या मांडीला मांडी लावून बसायचे. हे उद्योग बंद करा,” असा इशारा भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी दिला.

“सध्याचे सरकार कुचकामी”

“अजून किती दिवस साखरेचा गोड चहा घेत राहणार, किती दिवस आमरस खात राहणार, आता हे सर्व सोडून शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचे उद्योग बंद करा. सरकारमध्ये असताना उगाचच दिल्लीत आंदोलन कसे काय करता,” असा सवालही सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला.

“आमच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. त्याचे प्रश्न सोडवले. तसेच अनेक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संरक्षण देण्याचे प्रयत्न माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मात्र सध्याचे सरकार कुचकामी असून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत नाही. तसेच यांना शेतकऱ्याचे काही घेणे देणे नाही. फक्त स्वार्थ साधायचा,” अशी टीकाही खोत यांनी केली.

“डोक्यात भ्रम निर्माण केल्यामुळे दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन” 

“केंद्राने केलेल्या आध्यादेशचे रूपांतर आता कायद्यात झाले आहे. त्याबाबत अनेकांनी त्याचे स्वागत केले आहे. तीन कायद्याच्या माध्यमातून बाजारपेठेतून स्वतंत्र मिळाले आहे. या नवीन कायद्यामुळे शेतकरी आणि बाजारपेठांना फायदा होणार आहे. पण काहींनी डोक्यात भ्रम निर्माण केल्यामुळे दिल्ली येथील शेतकरी आंदोलन सुरू आहे.”

“या कायद्यामुळे शेतमालाला हमीभाव मिळू शकतो. तसेच 70 वर्ष जुनाट कायदे शेतकाऱ्यावर लादले. लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्याचे उदाहरण डोळ्यासमोर आहे. काँग्रेस आणि काही इतर पक्ष जाणूनबुजून टीका करत आहेत,” असेही सदाभाऊ खोत म्हणाले. (Sadabhau Khot Criticism Raju Shetti)

संबंधित बातम्या : 

राजू शेट्टींना विधानपरिषदेसाठी दलालांचे तुणतुणे वाजवण्याची वेळ, शेलारांचा जहरी वार

मेंढ्यांच्या कळपाचं नेतृत्व लांडग्यांकडे, गोपीचंद पडळकरांचा वार नेमका कुणावर?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.