सर्वसामान्य जनतेसाठी नवा पक्ष काढणार, सदाभाऊ खोत यांची घोषणा

रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला (Sadabhau Khot form new party) आहे. येत्या पाच फेब्रुवारीपासून सदाभाऊ खोत महाराष्ट्र दौरा करणार आहे.

सर्वसामान्य जनतेसाठी नवा पक्ष काढणार, सदाभाऊ खोत यांची घोषणा
Follow us
| Updated on: Jan 18, 2020 | 6:57 PM

औरंगाबाद : रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला (Sadabhau Khot form new party) आहे. येत्या पाच फेब्रुवारीपासून सदाभाऊ खोत महाराष्ट्र दौरा करणार आहे. तसेच एप्रिलमध्ये पहिले अधिवेशन घेतलं जाणार आहे. नव्या पक्षाचा झेंडा आणि नाव जनतेतून आलं पाहिजे, म्हणूनच लोकांना नाव आणि झेंडा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुचवावं, असं आवाहन सदाभाऊ खोत यांनी केलं. औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची माहिती (Sadabhau Khot form new party) दिली.

राजकारणापासून अलिप्त असलेले आणि सज्जन लोक पक्षात सामावून घेऊ. हा पक्ष सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी काम करेल. फडणवीस सरकारच्या काळात शेतकरी वंचित राहिला. आताच असो किंवा आधीच सरकार, शेतकरी कर्जमाफी देताना निकष न लावता कर्जमाफी केली पाहिजे होती, असं मत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केलं.

निवडणुकीच्या काळात जे आश्वासन उमेदवार देतात ती शपथपत्र म्हणून घेतली पाहिजे. निवडून आल्यावर त्यांनी दिलेलं आश्वासन तीन महिन्यात पाळलं नाही, तर त्याच पद काढून घेण्यात यावं अशी भूमिका निवडणूक आयोगाने घ्यावी अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली. रयत क्रांती संघटनेचा निर्धार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात संघटनेची नव्याने उभारणी आणि त्याची वाटचाल याबाबत मंथन करण्यात आलं. आता आपल्याला संधी असल्याच यावेळी सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.

आज शरद जोशी यांची शेतकरी संघटना सोडली. तर शेतकऱ्यांसाठी झटणारे सर्व सत्ताधाऱ्यांसोबत गेल्याने रस्त्यावर उतरणारे आपण एकटेच असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. आज आपल्यासोबत काम करणारा वर्ग शेतकरी आहे. दिवसभर काम केल्यावर आता रात्री आपल्या संघटनेसाठी काम करा. झेंडा आपला घ्या आणि त्याची काठी मात्र शेतकऱ्यांची घ्या. आपला प्रचार आणि प्रसार करा, असं आवाहन खोत यांनी पदाधिकाऱ्यांना केलं.

खर्च कमी करा, मेळाव्यात खाली टॉवेल टाकून आलेल्या कार्यकर्त्यांना मदतीचा आवाहन करा. कोणी दहा रुपये, कोणी वीस रुपये अशी मदत करेल. ती मदत आपल्या संघटनेच्या कामी येईल. आता विरोधी बाकावर बसून तुमचा आवाज म्हणून काम करणार आहे. ही संघटना घरच्या भाकरी खाऊन मोठी झाली ते सर्वाना कळलं पाहिजे. असं आवाहन सदाभाऊ खोत यांनी मेळाव्यात (Sadabhau Khot form new party) केलं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.