Political News | ‘या’ आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, आता पुढची भूमिका काय?
Political News | माजी मंत्र्याने तडकाफडकी आमदारकीसह पक्ष सदस्यतावाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. जाणून घ्या सविस्तर.
लखनऊ | राजकीय विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. बड्या नेत्याने आमदारकीसह पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे या नेत्याने विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याच्या 24 तासांआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यामुळे आता या नेत्याची भाजपात घरवापसी होणार असल्याची चर्चा रंगली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधी समाजवादी पार्टीच्या अखिलेश यादव यांना मोठा झटका लागला आहे. सपाचे नेते दारा सिंह चौहान यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
दारा सिंह चौहान यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांच्याकडे दिला. हा राजीनामा महाना यांनी स्वीकार केला. आता माजी मंत्री राहिलेले चौहान भाजपात प्रवेश करु शकतात. इतकंच नाही, तर भाजपकडून चौहान यांना आगामी निवडणुकीत लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. दारा सिंह चौहान हे घोषी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते. चौहाने हे गेल्या भाजप सरकारमध्ये वन आणि पर्यावरण मंत्री होते. मात्र विधानसभा निवडणूक 2022 आधी त्यांनी भाजपला रामराम ठोकत समाजवादी पार्टीत प्रवेश केला होता. दारा सिंह चौहान यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यांची बड्या नेत्यांमध्ये गणना केली जाते.
दारा सिंह चौहान यांचा आमदारकीचा राजीनामा
भाजपा छोड़ सपा में आये दारा सिंह चौहान ने सपा से दिया इस्तीफ़ा। pic.twitter.com/3HXl2JyZbT
— SANJAY TRIPATHI (@sanjayjourno) July 15, 2023
गृहमंत्र्याची भेट
Dara Singh Chauhan, Samajwadi Party MLA from Ghosi in Mau district, resigned from the Uttar Pradesh Assembly and Samajwadi Party’s membership earlier today.
He met Union Home Minister Amit Shah at his residence in Delhi yesterday. pic.twitter.com/7XhASiLY0g
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) July 15, 2023
दारा सिंह चौहान यांनी राजीनामा देण्याच्या 24 तासांआधी म्हणजेच 14 जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नवी दिल्लीतील राहत्या घरी भेट घेतली होती.
योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
दारा सिंह चौहान हे योगी आदित्यनाथ सरकारमध्ये 2017 ते 2022 या दरम्यान कॅबिनेट मंत्री होते. मात्र त्यांनी 12 जानेवारी 2022 रोजी राजीनामा दिला. “भाजप सरकारकडून आपल्याकडे जाणीवपूर्णक दुर्लक्ष होतोय, त्यामुळे मी हैराण आहे. समाजातील मागासवर्गीय, वंचित, दलित, शेतकरी या घटकाकडे दुर्लक्ष केलं जातंय. तसेच मागासवर्गीय आणि दलितांच्या आरक्षणाशी खेळलं जातंय”, असं तेव्हा दारा सिंह चौहान भाजपला रामराम करताना म्हणाले होते.
दारा सिंह चौहान यांची राजकीय कारकीर्द
दारा सिंह चौहान यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात बहुजन समाज पार्टीतून केली होती. चौहान हे 1996-2000 या काळात राज्यसभा खासदार होते. त्यानंतर चौहान हे 2009 मध्ये बसपाच्या तिकीटावर घोसी मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले.