धगधगत्या मशालीवरही दावा! ‘या’ पक्षाची निवडणूक आयोगाकडे धाव, दोन मशाली नेमक्या कोणत्या?

उद्धव ठाकरेंना मशाल चिन्ह मिळालंय पण हेच चिन्ह आणखी एका पक्षाचं आहे. हा पक्ष आता निवडणूक आयोगाकडे दाद मागतोय...

धगधगत्या मशालीवरही दावा! 'या' पक्षाची निवडणूक आयोगाकडे धाव, दोन मशाली नेमक्या कोणत्या?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 12, 2022 | 9:34 AM

दिनेश दुखंडे, मुंबईः प्रचंड राजकीय खलबतं (Politics) आणि न्यायालयीन लढाईनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला मशाल हे चिन्ह मिळालंय. धगधगत्या मशालीचं (Burning torch) हे चिन्ह ठाकरे गटाने मोठ्या उत्साहात स्वीकारलंदेखील. पण आता पुन्हा एकदा हे चिन्ह संकटात सापडण्याची चिन्हं आहे. धगधगती मशाल हे आणखी एका पक्षाचं चिन्ह आहे. आता हा पक्ष निवडणूक आयोगाकडे धाव घेण्याच्या तयारीत आहे. बिहारमधील समता पार्टीचं हे चिन्ह आहे.

ठाकरे गटाची मशाल आणि या बिहारमधल्या समता पार्टीच्या मशालीत थोडा फरक आहे. उद्धव ठाकरेंची मशाल गोल आकारात भगव्या रंगात आहे. तर समता पार्टीची मशाल दोनच रंगात आहे. दोन हिरवे आडवे पट्टे, त्यात मध्यभागी पांढरा पट्टा, त्यावर धगधगती मशाल, असं समता पार्टीचं चिन्ह आहे.

1994 समता पार्टी या पक्षाची स्थापना दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांनी केली होती. 1996 साली समता पार्टीला मशाल चिन्ह देण्यात आलं.

मात्र 2004 मध्ये या पार्टीची मान्यता निवडणूक आयोगाकडून रद्द करण्यात आली. तरीही समता पार्टी सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहे.

समता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तसं पत्र दिलं आहे. देवळेकर यांनी यापूर्वीच ईमेलद्वारे मशाल या पक्षावर हक्क सांगितला आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चिन्हामुळे मतदारांचा गोंधळ उडू शकतो, असं देवळेकर यांचं म्हणणं आहे. दोन चिन्हांमुळे मतविभागणी होऊ शकते. त्यामुळे मशाल चिन्ह इतर पक्षाला देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, काल एकनाथ शिंदे गटाला ढाल आणि दोन तलवारींचं चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलं आहे. हे चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा पुन्हा एकदा केला.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.