चिन्हाचं त्रांगडं, मशालीवरून समता पार्टी आक्रमक, निवडणूक आयोगाला 3 प्रश्न!

| Updated on: Oct 13, 2022 | 2:59 PM

मशाल या चिन्हावरून सुरू असलेल्या वादामुळे समता पार्टीच्या कार्यकर्त्यात व उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासाठी आपल्याला सुरक्षा प्रदान करण्याची मागणीही देवळेकर यांनी केली आहे.

चिन्हाचं त्रांगडं, मशालीवरून समता पार्टी आक्रमक, निवडणूक आयोगाला 3 प्रश्न!
Image Credit source: social media
Follow us on

मुंबईः एकिकडे अंधेरी पोट निवडणुकीच्या उमेदवाराचा प्रश्न टांगलेलाय तर दुसरीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या नव्या चिन्हाचाही वाद सुटता सुटेना. निवडणूक आयोगाने शिवसेनेला (Shivsena) धगधगती मशाल हे चिन्ह दिलंय. तर मशाल हे आमचंही चिन्हा असल्याचा दावा बिहारच्या समता पार्टीने (Samata Party) केला आहे. समता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.

समता पार्टीचे मशाल हे चिन्ह 2004 नंतर वापरण्यात आलेलं नाही, असं स्पष्टीकरण देत निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला हे चिन्ह बहाल केलंय. मात्र 2014 आणि 2021 मध्ये बिहार ग्रामपंचायत निवडणुकीत आम्ही हेच चिन्ह वापरल्याचा दावा देवळेकर यांनी केलाय.

असं असेल तर या दोन निवडणुकांमध्ये आम्ही कोणत्या पक्षावर निवडणुका लढवल्या? याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यावं, असा सवाल देवळेकर यांनी केलाय.

1994 पासून राष्ट्रीयीकृत मशाल हे चिन्ह आमचे आहे असा दावा देवळेकर यांनी केलाय. शिवसेनेच्या नव्या चिन्हाबाबत हरकत घेत समता पार्टी ( SAP ) यांनी निवडणूक आयोग कडे हे चिन्ह आमचा असल्याचा दावा केला आहे.

धनुष्यबाण गेल्यानंतर शिवसेनेला जसं दुःख झालंय, तसं दुःख आम्हाला नाही का होत, असा सवाल देवळेकर यांनी केलाय.

तर झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचंही धनुष्यबाण हे चिन्ह आहे. या पक्षाने महाराष्ट्रात येऊन धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवली तर शिवसेनेला चालेल का, असा सवालही देवळेकर यांनी केलाय.
या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनीही आपलं मत जाहीर करण्याचं आवाहन देवळेकर यांनी केलंय.