महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्याला संभाजी ब्रिगेडचा विरोध

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता हिंदुत्वाच्या राकारणाकडे वळत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे लवकरच मनसेच्या झेंड्यातही बदल होणार असल्याची चर्चा सुरु आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्याला संभाजी ब्रिगेडचा विरोध
Follow us
| Updated on: Jan 07, 2020 | 5:54 PM

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता हिंदुत्वाच्या राकारणाकडे वळत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे लवकरच मनसेच्या झेंड्यातही बदल होणार असल्याची चर्चा सुरु आहे. पण मनसेच्या या नव्या झेंड्याला संभाजी ब्रिगेडकडून विरोध (Sambhaji Brigade Against MNS new flag) करण्यात आला आहे. झेंड्यात नक्की बदल होणार का यावर मात्र अजून मनसेकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

मनसेने आता नवीन भगवा झेंडा निर्माण करुन त्यावर ‘राजमुद्रा’ छापलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ‘राजमुद्रा’ ही राजकारण करण्याचे साधन नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी राजमुद्रेची निर्मिती केलेली आहे. त्या राजमुद्रेचा वापर कुठल्याही पक्षांनी राजकारण करण्यासाठी करु नये, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडची आहे. त्यामुळे मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा छापण्यास संभाजी ब्रिगेडचा तीव्र विरोध आहे.

“मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समतेचा भगवा झेंडा घेतला असेल तर आम्ही त्याचे स्वागत करु. आम्ही भारतीय संविधान आणि लोकशाही मानणारे व्यक्ती आहोत. परंतु ‘राजमुद्रा’ वापरणं हे महाराष्ट्रातील शिवप्रेमी आणि संभाजी ब्रिगेड सहन करणार नाही. तथागत भगवान गौतम बुध्द, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज यांनीही शांतीचे प्रतीक म्हणून भगवा झेंडा स्विकारला होता. हेच मनसेनेही स्विकारावं, त्यांनी हिंदुत्वाची झालंर पांघरु नये”, असंही संभाजी ब्रिगेडने म्हटलं.

पहिल्या मूळ झेंड्यात जातीचे रंग वापरले गेले? आता या जातीच्या रंगाचं मनसे करणार काय ? हा प्रश्न महाराष्ट्र समोर पडलेला आहे. देशाचे आणि राज्याचे निवडणूक आयोग छत्रपती यांचे वंशज आणि महाराष्ट्र सरकार यांच्याकडेही या झेंड्या विरोधात आणि झेंड्यावरील राजमुद्रेविरोधात संभाजी ब्रिगेड तक्रार करणार आहे. राज्यकारभाराची निशाणी आहे ती झेंड्यावर मनसेला वापरता येणार नाही, अशी संभाजी ब्रिगेडची ठाम भूमिका आहे. यासाठी मनसे विरोधात संभाजी ब्रिगेड भविष्यात तीव्र संघर्ष करणार आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.