जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या गाड्यांचा ताफा अडवला, ‘एक मराठा-लाख मराठा’ घोषणांनी परिसर दणाणला
जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला. (Sambhaji brigade And maratha karyakarta block jayant patil And Dhananjay munde Convoy Hingoli basmat )
जालना : जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant Patil) आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संभाजी ब्रिगेड आणि मराठा आंदोलकांनी दोन्ही मंत्र्यांचा ताफा अडवला. यावेळी एक मराठा लाख मराठा घोषणांनी आंदोलकांनी परिसर दणादून सोडला होता. (Sambhaji brigade And maratha karyakarta block jayant patil And Dhananjay munde Convoy Hingoli basmat)
आंदोलकांनी ताफा अडवला, घोषणांनी परिसर दणाणून सोडला
राष्ट्रवादी काँग्रसने राज्यात परिसंवाद रॅली काढली आहे. औंढा नागनाथवरुन ही रॅली वसमतच्या दिशेने जात होती. बोराळ पाटी दरम्यान जवळपास 30 ते 35 कार्यकर्त्यांनी मंत्रीमहोदयांचा ताफा अडवला. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘आरक्षण मिळालंच पाहिजे, एक मराठा लाख मराठा’, अशा घोषणांनी आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.
जयंत पाटील यांनी निवेदन स्वीकारलं
यावेळी आंदोलकांचं आक्रमक रुप पाहता गाडीतून मंत्री जयंत पाटील खाली उतरले आणि आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतलं. तसंच त्यांच्याकडून निवेदन देखील स्वीकारुन त्यांना आरक्षणप्रश्नी निर्णय घेतला जाईन, असं आश्वस्त केलं. पाटील याच्या बरोबर यावेळी धनंजय मुंडे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर देखील होत्या. त्यांनीही आंदोलकांनी दिलेलं निवेदन स्वीकारलं.
राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रा स्थगित
डेल्टा प्लस व्हेरियंटचे राज्यात रुग्ण वाढत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेली परिवार संवाद यात्रा आजपासून स्थगित करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे आमदार राजू नवघरे यांनी आयोजित केलेल्या परिवार संवाद यात्रेला धावती भेट देऊन ही यात्रा स्थगित करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हिंगोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. जेव्हा कोव्हिडचे प्रतिबंध कमी होतील तेव्हा परभणी जिल्हापासून पुन्हा यात्रा सुरू केली जाईल, असं जयंत पाटील म्हणाले.
हिंगोलीच्या परिवार संवाद यात्रेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रा आज हिंगोली जिल्ह्यात पोहीचली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या यात्रेचं नेतृत्व करत आहेत. कळमनुरी येथे संवाद यात्रा पोहचली असता या यात्रेत कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं बघायला मिळालं. अनेकांच्या तोंडाला मास्कही बघायला मिळाला नाही, तर ज्यांनी घातला होता तो त्यांच्या हनुवटीवर दिसून आला. कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांच्या सत्कारासाठी मोठ्या वजनाचा हार तयार केला होता. हार जेसीबीला लावून तयार होता, पण जयंत पाटील यांनी हार स्वीकारला नाही, हार घेणं टाळलं.
(Sambhaji brigade And maratha karyakarta block jayant patil And Dhananjay munde Convoy Hingoli basmat)
हे ही वाचा :
मुंबई महानगरपालिकेची सरस कामगिरी; 35 दिवसांत उभारलं 2170 बेड्सचं अत्याधुनिक हॉस्पिटल
भर कार्यक्रमात चंद्रकांत खैरे आणि सुभाष देसाई यांच्यात नाराजीनाट्य, सत्कार कारण ठरला!