Uday Samant : संभाजी ब्रिगेडने अनेकवेळा हिंदू धर्माच्या महंतांवर टीका केली, उदय सामंताचं अंबादास दानवे यांना उत्तर

उद्योग मंत्री उदय सावंत यांच्या धुळे जिल्ह्यात दौऱ्या दरम्यान शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. उदय सामंतांचा ताफा अडवणाचा प्रयत्न करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Uday Samant : संभाजी ब्रिगेडने अनेकवेळा हिंदू धर्माच्या महंतांवर टीका केली,  उदय सामंताचं अंबादास दानवे यांना उत्तर
Uday Samant : संभाजी ब्रिगेडने अनेक वेळा हिंदू धर्माच्या महंतांवर टीका केली, उदय सामंताचं अंबादास दानवे यांना उत्तर Image Credit source: TV9marathi
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 7:31 PM

मुंबई : शिवसेनेतून बंड केलेल्या आमदार भाजपाच्या (BJP) स्क्रिप्टवर काम करत असल्याच्या आरोप अंबादास दानवे (Ambadas Danwe) यांनी केला आहे. यावर उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी उत्तर दिले असून अंबादास दानवे यांच्या आरोपांना आपण कुठलीही किंमत देत नसून महाराष्ट्राच्या जनतेला अभिप्रेत असलेले काम एकनाथ शिंदे करीत आहेत असा टोला उदय सामंत लगावला आहे. पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जनतेच्या प्रश्नांवर काम करीत असून यामुळे अनेकांचा पोटशूळ उठल्याची टीका उदय सामंत यांनी केली.

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युतीवर बोलताना उदय सामंत म्हणाले संभाजी ब्रिगेड या संस्थेने अनेक वेळा हिंदू धर्माच्या महंतांवर टीका केली आहे. यामुळे 2024 च्या निवडणुकीत या युतीला जनता स्वीकारेल की नाही हे दिसेल. काल शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया आली आहे.

विविध सभा तसेच पत्रकार परिषदेमधून आमचा उल्लेख शिंदे गट म्हणून केला जातो. मात्र आमचा शिंदे गट नसून आम्ही विधानभवनात शिवसेना पक्ष म्हणून काम करत असून आम्ही पन्नास जणांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले आहे. कोणी कुठे मेळावा घ्यावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे अशी प्रतिक्रिया दसरा मेळाव्याबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

उद्योग मंत्री उदय सावंत यांच्या धुळे जिल्ह्यात दौऱ्या दरम्यान शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. उदय सामंतांचा ताफा अडवणाचा प्रयत्न करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवसैनिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. माजी आमदार शरद पाटील, अतुल सोनवणे, धीरज पाटील यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.