पदवीधर निवडणूक : भाजपच्या संग्राम देशमुखांना संभाजी ब्रिगेडच्या संग्राम देशमुखांचं आव्हान

राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडल्या जाणाऱ्या सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. (Pune graduate election )

पदवीधर निवडणूक : भाजपच्या संग्राम देशमुखांना संभाजी ब्रिगेडच्या संग्राम देशमुखांचं आव्हान
Follow us
| Updated on: Nov 16, 2020 | 6:02 PM

मुंबई : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडल्या जाणाऱ्या सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. (Pune Teachers& Graduate Constituency Election 2020) ही निवडणूक ऐन रंगात आली आहे. पदवीधरमधून तीन आणि शिक्षक मतदारसंघातून दोन जागा अशा एकूण 5 मतदारसंघांसाठी ही निवडणूक प्रक्रिया होत आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे,अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, उद्या अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. (Two Sangram Deshmukh contesting Pune graduate election)

पुणे पदवीधर मतदारसंघात संग्राम देशमुख नावाचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. भाजपतर्फे सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच मतदारसंघात नगरच्या संग्राम देशमुखांनीही आपला अर्ज दाखल केला आहे. राजकारण फक्त राजकारण्यांच्या मुलाबाळांनी करायचे आणि आम्ही केवळ सतरंज्या उचलायच्या का? असा सवाल करत संग्राम देशमुख यांनी आपली दावेदारी केली आहे.

कोण आहेत संग्राम देशमुख?

संग्राम देशमुख हे मूळचे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण या गावचे. त्यांनी बीएससी कॉम्प्युटर सायन्स ही पदवी घेतली आहे. कॉलेज चालू असताना अहमदनगरमध्ये एका सायबर कॅफेवर पार्ट टाईम काम केले. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर पुण्यात टेक महिंद्रामध्ये BPO मध्ये वर्षभर नोकरी केली. त्यानंतर एका खासगी कन्स्ट्रक्शन साईटवर नोकरी केली. नोकरीनंतर पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कच्या फेज 2 मध्ये भागीदारीत हॉटेल व्यवसाय केला.

त्यानंतर घरच्या अडचणीमुळे गावाकडे जावे लागले. गावाकडे गेल्यानंतर नोकरी आणि व्यवसायाच्या संधी शोधण्याऐवजी आपल्या घरच्या शेतीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी खर्चात शेती करण्याचे प्रयोग सुरु केले. ऊस, तूर, कांदा, आंबा बाग यासारख्या नगदी पिके आणि फळबागा लागवड करुन गावामध्ये एक उच्चशिक्षित आणि यशस्वी शेतकरी अशी स्वतःची ओळख निर्माण केली.

कॉलेज जीवनापासूनच संग्रामच्या मनात वाचनाची आवड होती. पुण्यात आल्यानंतर ते संभाजी ब्रिगेडशी जोडले गेले. वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवरील आंदोलनात त्यांनी भाग घेतला. पुरोगामी विचारांचे कार्यक्रम, छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा, शिवसन्मान जागर परिषद अशा सार्वजनिक स्वरूपातील कार्यक्रमाचे आयोजन केले. त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रागतिक विचारांचे लोक त्याच्याशी जोडले गेले.

राजकारण फक्त राजकारण्यांच्या मुलाबाळांनी करायचे आणि आम्ही केवळ सतरंज्या उचलायच्या का ? हा सवाल विचारणारी ही उमेदवारी आहे. पदवीधरची निवडणूक म्हणजे राजकीय नेत्यांचे पुनर्वसन करण्याची निवडणूक नाही, तर पदवीधरांना लोकशाहीने दिलेला विशेषाधिकार वापरून आपला योग्य प्रतिनिधी (नेता नव्हे) सभागृहात पाठवण्याची ही निवडणूक आहे, असं संग्राम देशमुख यांचं म्हणणं आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघ

पुणे पदवीधर मतदरासंघातून प्रमुख पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपतर्फे सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर, राष्ट्रवादी काँग्रेसनं अरुण लाड यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रताप माने यांनी उमेदवारी न मिळाल्यानं बंडखोरी केली आहे. वंचित बहुजन आघाडीनं प्रा. सोमनाथ साळुंखे यांना उमेदवारी जाहीर केलीय. मनसेकडून रुपाली पाटील, जनता दलाकडून शरद पाटील, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्षाकडून डॉ. अमोल पवार  अर्ज दाखल करणार आहेत. बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम

  • निवडणूक जाहीर : 5 नोव्हेंबर
  • उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस : 12 नोव्हेंबर
  • अर्ज छाननी : 13 नोव्हेंबर
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस : 17 नोव्हेंबर
  • मतदानाचा दिनांक : 1 डिसेंबर मतदान (सकाळी 8 ते सांयकाळी 5 )
  • मतमोजणी : 3 डिसेंबर
  • निवडणूक प्रक्रिया संपण्याचा दिवस : 7 डिसेंबर

(Two Sangram Deshmukh contesting Pune graduate election)

संबंधित बातम्या   

विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक : कोणत्या पक्षाचा उमेदवार कोण?   

नागपूर पदवीधर निवडणूक : दोघांपैकी एका अभिजीत वंजारींचा उमेदवारी अर्ज बाद  

विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक, पंकजा मुंडे समर्थकाचा अर्ज बाद

 

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.