Sambhaji Chhatrapati : छत्रपतींच्या घराण्यात फूट पाडण्याचा पवार-ठाकरेंचा डाव, संभाजी छत्रपती समर्थक केदार यांचा दावा

Sambhaji Chhatrapati : 1978 मध्ये वसंतदादांच्या पाठित खंजीर खूपसून स्वत: शरद पवार मुख्यमंत्री झाले. हे आम्ही ऐकून होतो. 23 मार्च 1994ला पवारांनी मराठ्यांच्याही पाठित खंजीर खुपसला.

Sambhaji Chhatrapati : छत्रपतींच्या घराण्यात फूट पाडण्याचा पवार-ठाकरेंचा डाव, संभाजी छत्रपती समर्थक केदार यांचा दावा
छत्रपतींच्या घराण्यात फूट पाडण्याचा पवार-ठाकरेंचा डाव, संभाजी छत्रपती समर्थक केदार यांचा दावाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 4:50 PM

पुणे: स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati)  यांना शिवसेनेने राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर संभाजीराजे समर्थकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. या प्रकरणावरून संभाजीराजे समर्थकांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्यावर टीका केली. छत्रपती संभाजी राजेंचे राजकारण संपवण्याचे षडयंत्र शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासारख्या राहू- केतूंनी चालवले आहे. या दोघांनीही छत्रपती घराण्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. हे राजकारण आम्ही खपवून घेणार नाही. सामान्य जनता संभाजीराजांच्या सोबत ठाम उभी आहे, असं संभाजीराजे समर्थक योगेश केदार यांनी म्हटलं आहे. तसेच संजय राऊत (sanjay raut) आज भविष्यवाणी करतो, तुम्हारे जैसे दो कौडी के सांसद महाराज के हवेली रोज आयेंगे और झुककर सलाम करेंगे. तुमची ही अवस्था तेव्हा अवघा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघेल, असं ही केदार यांनी म्हटलं आहे.

योगेश केदार यांनी फेसबुकवर व्हिडीओ ट्विट करून ही टीका केली आहे. 1978 मध्ये वसंतदादांच्या पाठित खंजीर खूपसून स्वत: शरद पवार मुख्यमंत्री झाले. हे आम्ही ऐकून होतो. 23 मार्च 1994ला पवारांनी मराठ्यांच्याही पाठित खंजीर खुपसला. मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण स्वत:च्या राजकारणासाठी इतर समाजात वाटून टाकलं. आता 23 मार्चचा जीआर समोर आणतोय, असं योगेश केदार यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपलाही ठाकरेंनी धोका दिला

आम्ही उद्धव ठाकरेंबाबतही ऐकून होतो. त्यांनी स्वत:च्या भावासोबत प्रतारणा केली. राज ठाकरे यांना धोका दिला आणि स्वत:च्या राजकारणासाठी राज यांना बाजूला केलं. आम्ही ऐकून होतो, सत्य असत्य माहीत नाही. उद्धव ठाकरेंनी भाजपशी धोकेबाजी केली आणि मुख्यमंत्री झाले. सत्य असत्य आम्हाला माहीत नाही. पण महाराष्ट्राच्या समोर एक सत्य आलं आहे. ठाकरे-पवार ही राहु केतूंची जोडी एकत्र आली आणि या दोघांनी षडयंत्र करून घराण्यात फूट पाडण्याचं काम दोन दिवसात चालवलंय, असा आरोपही त्यांनी केला. पवार-ठाकरे घराण्यात फूट पाडण्याचा प्रयत्न झाला आहे. पण समाज बांधव जागे झाले आहेत. तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. संभाजीराजे पर्याय म्हणून पुढे येतील. मुख्यमंत्री होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

म्हणून उमेदवारी नाकारली

छत्रपती संभाजीराजेंना विश्वासात घेतलं आणि त्यांच्याही पाठीत खंजीर खुपसला. याचं कारण म्हणजे अपक्ष म्हणून संभाजीराजे निवडून आले असते आणि स्वराज्य संघटना बांधणीस लागले असते तर यांचं राज्य गिळंकृत करतील अशी भिती या जहाँगीरदार सरदारांना वाटली, असा दावाही त्यांनी केला.

राऊत, तुम्ही मुजरा कराल

राऊत म्हणतात राजे, महाराजे कोणत्याही पक्षात जातात. पण छत्रपतींच्या घराण्याचा इतिहास आहे. आधी काही तडजोडी झाल्या असल्या तरी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न फक्त छत्रपती बघू शकतात. इतर राजे महाराजेंचं आम्हाला माहीत नाही. पण राज्यात संभाजीराजेंच्या रुपात नव्याने स्वराज्य उभारलं जाईल. राऊत तुमच्यासारखे कवडीमोल दर्जाचे खासदार संभाजीराजेंच्या महालात दररोज मुजरा करायला जातील हे लक्षात ठेवा. ही माझी भविष्यवाणी आहे. येणाऱ्या दोन वर्षात तुम्ही मुजरा करताना दिसाल, असंही त्यांनी सांगितलं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.