Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची भावना आहे. मालवण सिंधुदुर्गात राजकोट किल्ला आहे. अवघ्या आठ महिन्यात शिवरायांचा पुतळा कोसळला. या घटनेवरुन विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरलं आहे. संभाजी राजे यांनी या विषयाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. “मालवण राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शास्त्रोक्त पद्धतीने बसवण्यात आला नव्हता, याची कल्पना मी त्यावेळीच दिली होती” असं संभाजी राजे म्हणाले.
“12 डिसेंबर 2023 रोजी मी नरेंद्र मोदींना पत्र दिलं. पुतळ्याच काम पूर्णत्वाला नेललं नाही. त्यामुळे हा पुतळा बदलावा असं मी 12 डिसेंबर 2023 रोजी पत्रात नमूद केलं होतं” असं संभाजी राजे म्हणाले. “चार-पाच दिवस आधी हा पुतळा कोसळला महाराष्ट्राच्या दृष्टीने ही दुर्देवी बाब आहे. जनता आपल्या भावना व्यक्त करणार, जे घडायला नको होतं, ते घडलं” असं संभाजी राजे म्हणाले. “पुतळा गावात उभा करायचा असेल, तर अनेक जाचक अटी असतात. अनेकांना परवानगी सुद्धा मिळत नाही. खुद्द पंतप्रधान, राष्ट्रपती पुतळ्याच्या उद्घाटनासाठी येणार असतील, तर अनेक जाचक अटी असतात. या जाचक अटींच पालन झालं होतं का? कलासंच न्यायालयाने परवानगी दिली होती का? हे प्रश्न पुढे आले आहेत” असं संभाजी राजे म्हणाले.
‘मला आश्चर्य वाटतं मी, जेव्हा….’
“या घटनेत राजकारण बाजूला ठेण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या बाबतीत दुमत असू शकत नाही. पण काय चुकतय यावर चर्चा झाली पाहिजे” असं संभाजी राजे म्हणाले. “मला आश्चर्य वाटतं, मी गड-किल्ले अतिक्रमण मुक्त झाले पाहिजेत हा विषय हाती घेतला, तेव्हा या राजकीय नेत्यांनी भूमिका घेतली नाही” असं संभाजी राजे म्हणाले.