“देवेंद्रजी, तुम्ही अभ्यासू, गंभीर चुकांचं समर्थन करू नका, त्रिवेंदींना माफी मागायला भाग पाडा”

संभाजीराजेंचं फडणवीसांना आवाहन...

देवेंद्रजी, तुम्ही अभ्यासू, गंभीर चुकांचं समर्थन करू नका, त्रिवेंदींना माफी मागायला भाग पाडा
Follow us
| Updated on: Nov 21, 2022 | 10:53 AM

परभणी : भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबात केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होतेय. शिवरायांचे वंशज छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनीही सुधांशू त्रिवेदी यांच्या विधानाचा निषेध केलाय. तसंच देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी एक आवाहन केलंय.

देवेंद्र फडणवीस अभ्यासू माणूस आहेत. त्यांनी अशा चुकीच्या विधानाचं समर्थन करू नका.सुधांशू त्रिवेदी यांना माफी मागण्यासाठी भाग पाडा, संभाजीराजे म्हणालेत.

रात्री एक वाजता मी देवेंद्रजीची प्रतिक्रिया पाहिली. अशी वक्तव्य करणाऱ्या माणसाची पाठ राखण करणं हे अयोग्य आहे, असंही संभाजी राजे म्हणालेत.

देवेंद्रजी अशी पाठराखण का करताय असा मला प्रश्न पडलाय. वेळप्रसंगी मी देवेंद्रजींना याबाबत विचारणारही आहे, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

माझं स्पष्ट मत आहे की, सुधांशू त्रिवेदी यांनी शिवभक्तांची माफी मागितलीच पाहिजे, अशी आमची ठाम भूमिका आहे.देवेंद्रजींनी सुधांशू त्रिवेदीच्या माफी कडे विशेष लक्ष दिलं पाहिजे, असं संभाजीराजे म्हणालेत.

सुधांशू त्रिवेदी काय म्हणाले?

“औरंगजेबला पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांनी 5 वेळा माफी मागितली”, असं वादग्रस्त वक्तव्य सुधांशू त्रिवेदी यांनी केलं. यामुळे संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. सुधांशू त्रिवेदी यांचं हे जुनं विधान आहे. आजतक या वृत्तवाहिनीच्या डिबेट शोमध्ये बोलताना त्यांनी हे विधान केलंय. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडिया प्रचंड चर्चेत आहे. त्रिवेदी यांच्या या विधानावर जोरदार टीका होतेय.

सुधांशू त्रिवेदी यांच्या या विधानाचा सर्वच स्तरातून निषेध होतोय. संभाजीराजेंनीही त्रिवेंदींच्या माफीची मागणी केली आहे.

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.