“हर्षदा रेडकरवर ड्रग्ज प्रकरणात केस झाली, तेव्हा मी आणि क्रांती…” मलिक यांच्या आरोपांवर समीर वानखेडेंचं स्पष्टीकरण

ही घटना जुनी असून विनाकारण माझं नाव यात जोडलं जात आहे" असं स्पष्टीकरण एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आरोपांना उत्तर देताना दिलं.

हर्षदा रेडकरवर ड्रग्ज प्रकरणात केस झाली, तेव्हा मी आणि क्रांती... मलिक यांच्या आरोपांवर समीर वानखेडेंचं स्पष्टीकरण
क्रांती रेडकर, समीर वानखेडे, नवाब मलिक
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 11:31 AM

मुंबई : अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची मेहुणी ड्रग्ज व्यवसायात असल्याचा गंभीर आरोप ट्विटरवरुन केला होता. त्यानंतर खुद्द वानखेडेंनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. हे प्रकरण जवळपास 13-14 वर्ष जुनं आहे. हर्षदा रेडकर यांच्यावर ड्रग्ज प्रकरणात केस झाली, तेव्हा माझा आणि क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांचा विवाहही झाला नव्हतं, असं समीर वानखेडेंनी स्पष्ट केलं.

समीर वानखेडे यांचं स्पष्टीकरण काय?

“माझ्या मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर (Harshada Dinanath Redkar) यांच्या विरुद्ध जानेवारी 2008 मध्ये पुण्यात केस दाखल करण्यात आली होती. तेव्हा मी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या सर्व्हिसमध्येही नव्हतो. क्रांती रेडकर यांच्यासोबत 2017 मध्ये माझा विवाह झाला. म्हणजेच ड्रग्ज प्रकरणातील केसनंतर तब्बल नऊ वर्षांनी. त्यामुळे माझा या प्रकरणाशी काही एक संबंध येत नाही. ही घटना जुनी असून विनाकारण माझं नाव यात जोडलं जात आहे” असं स्पष्टीकरण एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आरोपांना उत्तर देताना दिलं.

नवाब मलिक यांचे आरोप काय?

“समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात आहे का? तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित असल्यामुळे तुम्ही उत्तर द्या. हा घ्या पुरावा” असं लिहित नवाब मलिक यांनी ट्विटरवर काही कागदपत्रे पुरावे म्हणून सादर केले होते.

ज्ञानदेव वानखेडेंकडून मलिक यांच्यावर अब्रूनुकसानीचा खटला

याआधी, समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात बॉम्बे हायकोर्टात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. प्रसारमाध्यम, सोशल मीडियामध्ये आपल्या कुटुंबियांबद्दल प्रसारित होणाऱ्या वृत्तांवर बंदी यावी, यासाठी ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. सोमवारी याबाबत कोर्टात सुनावणी होणार आहे.

संबंधित बातम्या :

“क्रांती रेडकर यांची बहीण ड्रग्ज व्यवसायात आहे का?” नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

नवाब मलिकांविरोधात मानहानीचा दावा, समीर वानखेडेंच्या वडिलांकडून 1.25 कोटींची मागणी

मोहित कंबोज हाच आर्यन खान किडनॅपिंग प्रकरणाचा मास्टरमाइंड; नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.