“अनिल देशमुखांनीच मला बोलवलं अन् त्या बैठकीत…”, समित कदम यांचा मोठा गौप्यस्फोट

समित कदम या व्यक्तीच्या माध्यमातून फडणवीस यांनी मला निरोप पाठवला होता, असा दावा अनिल देशमुख यांनी केला होता. आता या दावा खोटा असल्याचे समित कदम यांनी सांगितले आहे.

अनिल देशमुखांनीच मला बोलवलं अन् त्या बैठकीत..., समित कदम यांचा मोठा गौप्यस्फोट
Follow us
| Updated on: Jul 29, 2024 | 12:59 PM

Samit Kadam On Anil Deshmukh Meet : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सध्या आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मला प्रस्ताव दिला होता. समित कदम या व्यक्तीच्या माध्यमातून फडणवीस यांनी मला निरोप पाठवला होता, असा दावा अनिल देशमुख यांनी केला होता. आता या दावा खोटा असल्याचे समित कदम यांनी सांगितले आहे.

“मी एका पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे. मला अनेक राजकीय नेते ओळखतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अेक राजकीय नेतेही मला बैठकीसाठी बोलवतात. अशाच प्रकारे एका बैठकीसाठी अनिल देशमुखांनी मला बोलवलं होतं”, असा दावा समित कदम यांनी केला आहे. समित कदम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

“अनिल देशमुखांनीच मला बोलवलं”

“2016 पासून माझा जनसुराज्यशक्ती हा आमचा स्वतंत्र पक्ष आहे. मी त्याचा राज्याचा अध्यक्ष आहे. आम्ही NDA चे घटक पक्ष झाल्यानंतर पक्षाच्या कामानिमित्त आम्हाला वेगवेगळ्या बैठकीत निमंत्रण दिलं जातं. पंतप्रधान मोदींपासून ते राज्यातील विविध बैठकींसाठी आम्हाला बोलवलं जातं. त्यात फडणवीसांची भेट होते. त्यासोबत इतर पक्षातील नेत्यांचीही भेट होते. त्यामुळेच त्यांनी मला बोलवलं होतं.

अनिल देशमुख यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आम्ही एकमेकांशी चर्चा केली. त्यावर त्यांनी आम्ही तुम्हाला टीव्हीवर बघतो. तू दिल्लीला अमित शाहांना भेटता, त्यांच्याशी तुमचे संबंध आहेत. मोदींना तुम्ही भेटता, त्यांच्याशीही तुमचा सलोखा आहे. राज्याच्या अनेक बैठकीत तुम्ही असता. फडणवीस आणि इतर नेत्यांसोबतही तुम्ही दिसता. त्यामुळे मला तुमच्याशी संवाद करुन काही मदत होण्यासारखं असेल तर करायची आहे, याबद्दल आमची भेट झाली होती”, असा दावा समित कदम यांनी केला आहे.

माझे आणि फडणवीसांचे फोटो जगजाहीर

यासोबत अनिल देशमुख यांनी मला त्यात काहीही अर्थ वाटत नाही. अनिल देशमुख सारखे एकच फोटो दाखवत आहेत. अनिल देशमुखांनी माझे-देवेंद्र फडणवीसांसोबत असलेले फोटो दाखवले. यात नवीन काहीच नाही. माझे फेसबुक, इन्स्टाग्रामवर यावर जे काही फोटो आहेत, तेच फोटो त्यांनी दाखवले. त्यांनी त्यात काही हेरगिरी केलेली नाही. माझे आणि फडणवीसांचे फोटो जगजाहीर आहेत. अनेक वर्तमानपत्रात आलेले आहेत, असेही समित कदम यांनी सांगितले.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.