भाजप-मनसे युतीच्या चर्चा, संदीप देशपांडेंचं सूचक ट्वीट

मनसे पक्षाचा झेंडा आणि अजेंडा (हिंदुत्वाची कास) बदलण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा असताना मनसे सरचिटणीस संदीप देशपांडेंचं ट्वीट लक्ष वेधून घेत आहे

भाजप-मनसे युतीच्या चर्चा, संदीप देशपांडेंचं सूचक ट्वीट
Follow us
| Updated on: Jan 10, 2020 | 9:23 AM

मुंबई : भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुप्त भेट झाल्यानंतर भाजप-मनसे युतीच्या चर्चांना उधाण आलं असतानाच मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्या ट्वीटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘महाराष्ट्राच्या राजकारणात बेरीज महत्त्वाची, हे आपलं वैयक्तिक राजकीय निरीक्षण’ असल्याचं देशपांडे (Sandeep Deshpande Tweet) म्हणतात.

23 जानेवारीला मनसेचं महाअधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. मनसे पक्षाचा झेंडा आणि अजेंडा (हिंदुत्वाची कास) बदलण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे. त्याचवेळी, मनसेने व्यापक विचारधारा घेतल्यास आणि कार्यपद्धती बदलल्यास भविष्यात युती शक्य असल्याची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मांडली होती. या पार्श्वभूमीवर मनसे-भाजप एकत्र येण्याच्या शक्यता बळावल्या आहेत.

‘माझं वैयक्तिक राजकीय निरीक्षण “सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बेरीज महत्वाची. नाहीतर काँग्रेस शिवसेनेबरोबर गेली नसती आणि भाजपनी राष्ट्रवादीबरोबर दोन दिवसांची सोयरीक केली नसती” असं सूचक ट्वीट संदीप देशपांडे यांनी केलं आहे.

फडणवीस काय म्हणाले होते?

मनसे आणि भाजप एकत्र येणार का असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला, त्याबाबत फडणवीस म्हणाले, “मनसे आणि भाजप एकत्र येण्याची आज तरी कोणतीही चिन्हं नाहीत. मनसे आणि भाजपच्या विचारात अंतर आहे. आम्ही राष्ट्रीय पक्ष असल्याने व्यापक विचार करतो. पण मनसेचे विचार वेगळे आहेत. मनसेने विचार आणि कार्यपद्धती बदलली तर भविष्यात  विचार करु, पण सध्यातरी ही शक्यता वाटत नाही.”

फडणवीस-राज ठाकरे भेट

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मंगळवारी 7 जानेवारीला गुप्त भेट झाली होती. प्रभादेवी येथील हॉटेल इंडिया बुल्स स्कायमध्ये जवळपास दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली होती. महत्त्वाचं म्हणजे या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस हे पुढील दाराने, तर राज ठाकरे मागील दाराने बाहेर पडले. ‘टीव्ही 9 मराठी’च्या कॅमेऱ्यात ही दृश्यं कैद झाली होती.

या बैठकीसाठी अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली होती. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे मित्र गुरुप्रसाद रेगे हे या बैठकीला उपस्थित होते. महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे या बैठकीसाठी कोणत्याही सुरक्षा रक्षकाशिवाय आले होते. तर देवेंद्र फडणवीस यांनीही या बैठकीबाबत मोठी गोपनीयता बाळगली होती. या भेटीनंतर गुरुप्रसाद रेगे देवेंद्र फडणवीस यांना गाडीपर्यंत सोडण्यासाठी खाली आले होते.

मनसेचे महाअधिवेशन

शिवसेनेने भाजपची साथ सोडल्याने, मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता वर्तवली जात होती. गेल्या काही दिवसापासून तशा चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहेत. मनसेचं येत्या 23 जानेवारीला महाअधिवेशन होणार आहे. मनसेच्या कारकिर्दीतील हे पहिलं अधिवेशन आहे. या अधिवेशनात राज ठाकरे कोणती भूमिका जाहीर करणार याकडे मनसैनिकांचं लक्ष लागलं आहे.

Sandeep Deshpande Tweet

संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.