Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray News : ‘अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा’ बाळासाहेबांसह राज ठाकरेंचा फोटो टाकत कुणी केलं सूचक ट्वीट?

Sandeep Deshpande Tweet News : सुपर थर्टी सिनेमातील हिट डायलॉग संदीप देशपांडेनी राज ठाकरेंच्या फोटोसह ट्वीट केलाय.

Raj Thackeray News : 'अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा' बाळासाहेबांसह राज ठाकरेंचा फोटो टाकत कुणी केलं सूचक ट्वीट?
सूचक ट्वीट...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 7:26 AM

मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी सूचक ट्वीट केलं आहे. अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, वही बनेगा जो हकदार होगा, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत एक फोटोही पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray News) आणि बाळासाहेब ठाकरे  (Balasaheb Thackeray News) असून दोघंही हात जोडून अभिवादन करताना दिसत आहेत. महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात घडलेल्या राजकीय भूकंपानंतर राज ठाकरे यांच्या फोटोसह संदीप देशपांडे यांनी केलेल्या या ट्वीटचे अनेक अर्थ आता राजकीय जाणकारांकडून काढले जात आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील राजकीय स्पर्धा लपून राहिलेली नाही. त्यात मनसे आणि शिवसेना यांच्यातीलही चढाओढ महाराष्ट्रानं वेगवेगळ्या निवडणुकांमधून पाहिलेली आहे. एकमेकांवर राजकीय भूमिकांवरुन टीका करणं असेल किंवा एकमेकांविरोधातली राजकीय लढाई असेल, मनसे आणि शिवसेना असा संघर्ष कायमच पाहायला मिळाला आहे. त्यातच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेल्या ट्वीटने आता चर्चांना उधाण आलं आहे.

पाहा संदीप देशपांडे यांचं ट्वीट :

संदीप देशपांडे यांनी हृतिक रोशनच्या सुपर थर्टी या सिनेमातला डायलॉग ट्वीट करत उद्धव ठाकरेंना आणि शिवसेनेला अप्रत्यक्षपणे डिवचलंय.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरे यांनी मनसे सोडण्याआधी उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचं पक्षप्रमुख पद देण्यात आलं होतं. उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचा पक्षप्रमुख बनवण्याचा किस्सा खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीही सांगितलेला होता. दरम्यान, त्यानंतर आता 2019 च्या निवडणुकीत भाजपसोबत शिवसेनेचा झालेला सत्ता स्थापनेवरुनचा वाद, त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसोबत सरकार स्थापनेच्या वाटाघाटी आणि उद्धव ठाकरेंकडे चालून आलेलं मुख्यमंत्रीपद यावरुनही राजकारण रंगलं होतं.

अखेर महिन्याभरापूर्वी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. शिवसेनेच्या इतिहासातली ही सगळ्या मोठी बंडखोरी होती. त्यांनी आपल्यासोबत शिवसेनेच्या चाळीस आमदारांनो सोबत घेतलं. उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपशी युती करावी, अशी मागणी केली. इतकंच काय तर उद्धव ठाकरेंना त्यामुळे मुख्यमंत्रिपदावरुन पायऊतार होण्याची वेळ आली. अखेर महाविकास आघाडी सरकार पडलं आणि आता बंडखोर शिवसेना आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलंय. या नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

दरम्यान, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यातर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही कौतुक करत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना अभिनंदनाचं पत्र लिहिलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच राज ठाकरे यांची सदिच्छा भेटही घेतलेली. अशातच आता संदीप देशपांडे यांनी केलेल्या नव्या ट्वीटचे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.