Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भावी पंतप्रधानांना शुभेच्छा, संदीप देशपांडेंचे उद्धव ठाकरेंना चिमटे, म्हणाले मज्जा आहे एका माणसाची….

शात नरेंद्र मोदी यांना टक्कर देणारे एकमेव नेते म्हणजे उद्धव ठाकरे आहेत, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. त्यावरून संदीप देशपांडे यांनी असं खोचक ट्विट केलंय.

भावी पंतप्रधानांना शुभेच्छा, संदीप देशपांडेंचे उद्धव ठाकरेंना चिमटे, म्हणाले मज्जा आहे एका माणसाची....
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 10:13 AM

मुंबई : राज्यभरात होळीचा (Holi) उत्साह शिगेला पोहोचला आहे. एरवी एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या नेत्यांच्या आज काहीशा खरमरीत आणि एकमेकांना चिमटे काढणाऱ्या प्रतिक्रिया देत आहेत. यातच मनसे नेते संदीप देशपांडे यांचं ट्विट सध्या व्हायरल होतंय. उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता संदीप देशपांडे यांनी हे ट्विट केलंय. देशाच्या भावी पंतप्रधानांना शुभेच्छा.. भंकस वाटली असेल तर मला माफ करा, अशा शब्दात त्यांनी ट्विट केलंय. देशात नरेंद्र मोदी यांना टक्कर देणारे एकमेव नेते म्हणजे उद्धव ठाकरे आहेत, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. त्यावरून संदीप देशपांडे यांनी असं खोचक ट्विट केलंय.

संदीप देशपांडे यांचं ट्विट काय?

संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हणलंय, भावी पंतप्रधानांना शुभेच्छा.भंकस वाटली असेल तर माफ करा “पण बुरा ना मानो होली है “आता तुमच्याशी हिंदीतच बोललं पाहिजे तुम्ही आता पंतप्रधान होणार मज्जा आहे बाबा एका माणसाची….

संजय राऊत काय म्हणाले?

उद्धव ठाकरे हे गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा होती. त्यावर संजय राऊत यांनी काल स्पष्ट वक्तव्य केलंय. उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी घ्याव्यात, असं आम्ही सांगितलंय. त्याबद्दल ते लवकरच विचार करतील. आदित्य ठाकरे यांनी काही महिन्यांपूुर्वी विरोधी पक्षांच्या भेटी घेतल्या होत्या, असंही राऊत यांनी सांगितलं.

नरेंद्र मोदींच्या विरोधातला चेहरा?

उद्धव ठाकरे यांचा चेहरा उत्तम आहे. अनेक विरोधी पक्षांना वाटतं की त्यांनी विरोधी पक्षांचं नेतृत्व करावं. त्यामुळे सध्या विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. तसेच देशात नरेंद्र मोदी यांच्याविरोधात उद्धव ठाकरे यांचंच नेतृत्व प्रभावी असल्याचं वक्तव्यही राऊत यांनी याआधी केलंय.

‘त्या’ हल्ल्यामागे ठाकरेंची शिवसेना?

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी सकाळी प्राणघातक हल्ला झाला होता. शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकच्या वेळी काही गुंडांनी त्यांच्यावर स्टंप आणि रॉडने हल्ला केला. यात संदीप देशपांडे यांच्या हात आणि पायाला इजा झाली. या हल्ल्यामागे ठाकरे गटाचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. तर भाजप नेते नितेश राणे यांनी यामागे युवा सेना नेते वरुण सरदेसाईंचा हात आहे का, याची चौकशी करण्याची मागणी केली होती. संदीप देशपांडे यांनीही पोलिसात लेखी जबाब दिला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.