“मी कुणाला पैसे वाटले, पुरावे दाखवा”, संदीपान भुमरे यांचं ओपन चॅलेंज
"मी कुणाला पैसे वाटले, पुरावे दाखवा", असं चॅलेंजही संदीपान भुमरे यांनी दिलं आहे.
पैठण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची आज पैठणमध्ये जाहीर सभा होतेय. या सभेला येण्यासाठी पैसे वाटण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. एक ऑडिओ क्लिपदेखील व्हायरल होत आहे. त्याला रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी उत्तर दिलंय. आम्ही पैसे वाटलेले नाहीत. या ऑडिओ क्लिप त्यांनीच तयार केल्या आहेत. असले आरोप करणं महिलांचा अपमान आहे. खैरे जनतेचा अपमान करत आहेत, असं संदीपान भुमरे म्हणालेत. शिवाय “मी कुणाला पैसे वाटले, पुरावे दाखवा”, असं चॅलेंजही संदीपान भुमरे यांनी दिलं आहे.