Sandipan Bhumare: “होय आहेच मी गावठी मंत्री!, खैरे स्वत:च शिवसेनेत नाराज” संदीपान भुमरेंचा पलटवार

संदीपान भुमरे हे गावठी मंत्री आहेत. त्यामुळे संदीपान भुमरे काहीही बोलत असतात, असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी मंत्री संदिपान भुमरे यांना डिवचलं. भुमरे यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे.

Sandipan Bhumare: होय आहेच मी गावठी मंत्री!, खैरे स्वत:च शिवसेनेत नाराज संदीपान भुमरेंचा पलटवार
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 1:37 PM

औरंगाबाद : संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) हे गावठी मंत्री आहेत. त्यामुळे संदीपान भुमरे काहीही बोलत असतात, असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांना डिवचलं. आता संदिपान भुमरे यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. “होय मी आहेच गावठी मंत्री… मी आहेच मुळात गावठी पण मी कुठेही काहीही बोलत नाही”, असं भुमरे म्हणाले आहेत. त्यामुळे आता शिंदेगट विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना अश्या एका नव्या वादाला तोंड फुटलंय. याशिवाय चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) हे स्वतःच शिवसेनेत नाराज आहेत. ठाकरे गटात राहिलेले अनेक आमदार शिंदे गटात येणार आहेत, असा दावा त्यांनी पुन्हा एकदा केला आहे.

बंडामुळे मातोश्रीला किंमत

संदिपान भुमरे यांनी मातोश्रीवरही आपल्या टीकेचा बाण सोडला आहे. खैरेंना मातोश्रीवर कुणी विचारत नव्हतं. आम्ही उठाव केला म्हणून त्यांना किंमत मिळाली आहे. चंद्रकांत खैरे म्हणजे या जिल्ह्याला लागलेली कीड आहे. या शहराची वाट लागण्याला कारणीभूत चंद्रकांत खैरे आहेत. चंद्रकांत खैरे यांनी शहराची वाट लावली, असंही भुमरे म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं?

चंद्रकांत खैरे यांनी मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर कडक शब्दात टीका केली. संदीपान भुमरे हे गावठी मंत्री आहेत त्यामुळे संदीपान भुमरे काहीही बोलत असतात, असं म्हणत त्यांनी संदिपान भुमरेंवर टीका केली आहे. “शिंदे गटातील अनेक आमदार फोन करुन म्हणतात आमचं चुकलं! शिंदेंसोबत गेलेले 10-12 आमदार मूळ शिवसेनेत परत येणार आहेत, असा विश्वास खैंरेंनी व्यक्त केला आहे. “उद्धव ठाकरेंचे समर्थक 2 आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते लवकरच शिंदे गटात सामील होतील”, असा दावा संदिपान भुमरे यांनी केला होता. त्यावर खैरेंनी उत्तर दिलं. “आमच्याकडचं कुणीही शिंदेगटात जाणार नाही. पण उलट यांचे 40 आमदार आम्हाला फोन करत आहेत. शिंदे गटातील अनेक आमदार फोन करुन म्हणतात आमचं चुकलं!, असं म्हणतात. मी त्यांना म्हटलं की या मग परत उद्धव साहेबांकडं… त्यामुळे शिंदेंसोबत गेलेले 10-12 आमदार मूळ शिवसेनेत परत येणार आहेत”, असं विश्वास खैंरेंनी म्हटलं. त्याला आता भुमरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.