Sandipan Bhumre : संदीपान भुमरेला वडापाव खाता येत नाही या संजय राऊत यांच्या वक्तव्याला, भुमरेंचं प्रत्युत्तर

अदित्य ठाकरेच्या दौऱ्याला प्रतिसाद नव्हता. बाळासाहेबांचे सर्व लोक आमच्यासोबत, आम्ही दौरा काढला की लोक आमच्यासोबत दिसतील. एकनाथ शिंदेचा दौरा सुरू होणार आहे.

Sandipan Bhumre : संदीपान भुमरेला वडापाव खाता येत नाही या संजय राऊत यांच्या वक्तव्याला, भुमरेंचं प्रत्युत्तर
Sandipan Bhumre संदीपान भुमरेला वडापाव खाता येत नाही या संजय राऊत यांच्या वक्तव्याला, भुमरेंचं प्रत्युत्तर
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 3:10 PM

मुंबई – संजय राऊत (Sanjay Raut) काय बोलतात याला महत्व नाही. हे सरकार अडीचं वर्षे पूर्ण क्षमतेनं टिकणार आहे. अदित्य ठाकरेचा (Aditya Thackeray) दौरा झंझावत नाही. अदित्य ठाकरेच्या दौऱ्याला प्रतिसाद नव्हता. बाळासाहेबांचे सर्व लोक आमच्यासोबत, आम्ही दौरा काढला की लोक आमच्यासोबत दिसतील. एकनाथ शिंदेचा दौरा सुरू होणार आहे. शिंदेचा दौरा झंझावत सुरू होईल. संदीपान भुमरे (sandipan bhumre) वडापाव खाणारे नाही चटणी भाकर खाणारे आहेत असा टोला भुमरे यांनी संजय राऊतांना लगावला. संजय राऊत साहेबांचा तोल गेलेला आहे. सगळ्या आमदारांविषयी आम्हाला आदर आहे. आदित्य ठाकरे तीन वर्षापूर्वी दौरे काढले असते तर दौरे काढायची पाळी आली नसती. खरी शिवसेना आमची आहे. आम्हालाचं धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळणार आहे. ज्यावेळी निवडणुका येतील तेव्हा जागा दाखवून देवू, रँली काढून भावनिक होवू काही होत नाही असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेला सुद्धा लगावला.

आमदार संदीपान भुमरे यांचे समर्थक त्यांच्या पाठीशी

शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्या समर्थनार्थ काही दिवसांपुर्वी पैठण विधानसभा मतदारसंघातील धुळे-सोलापुर हायवे वर समर्थकांनी मोठी रॅली काढली होती. या रॅलीमध्ये शेकडो समर्थकांसह पारंपारिक वेशभूषा मध्ये अनेक बंजारा महिला सुद्धा सहभागी झाल्या होत्या. या वेळी या कार्यकर्त्यांनी संदीपान भुमरे एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या जोरदार घोषणा दिल्या. संदिपान भुमरे यांनी घेतलेली भूमिका योग्य असून आम्ही त्यांच्या पाठीशी कायम आहोत असे सुद्धा कार्यकर्त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांची मेळाव्यात एंट्री

शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदे गटात सामिल झाल्याने शिवसैनिकांनी शिवसंवाद मेळाव्याप्रसंगी लोखंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आदित्य ठाकरे यांच्या भाषा दरम्यान शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांची मेळाव्या स्थळी एंट्री झाली. शिवसैनिकांनी भावी खासदार असा उल्लेख करत घोषणा दिल्या. आदित्य ठाकरे यांनी बबनराव घोलपांचा हातात हात घेताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे शिर्डीत आता लोखंडे विरोधात घोलप हे खासदारकीचे उमेद्वार असतील अशी चर्चा होवू लागलीय.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.