51 आमदार आणि 12 खासदारांनी हरामखोरी केली नाही तर… अंबादास दानवेंच्या टीकेला संदीपान भुमरेंचे प्रत्युत्तर
आम्ही हरामखोरी केली नाही आम्ही उठाव केला. 51 आमदार आणि 12 खासदार यांनी केलेल्या कृतीला हरामखोरी म्हणत नाहीत असे स्पष्टीकरण पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी दिले आहे.
औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे (sandipan bhumre) यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर (uddhav thackeray) टीका केली होती. भुमरेंनी नमक हरामी आणि हरामखोरीची भाषा करू नये असा इशारा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (ambadas danve) यांनी दिला होता. अंबादास दानवेंच्या टीकेला संदीपान भुमरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहेत.
औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे औरंगाबाद मध्ये आगमन झाले. यावेळी अंबादास दानवेंनी त्यांच्यावर टीका केली.
संदीपान भुमरे यांनी हरामखोरी केली त्यानंतर भुमरे पालकमंत्री झाले अशी टीका अंबादास दानवे यांनी केली होती. असता यावर संदिपान भुमरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही हरामखोरी केली नाही आम्ही उठाव केला. 51 आमदार आणि 12 खासदार यांनी केलेल्या कृतीला हरामखोरी म्हणत नाहीत असे स्पष्टीकरण पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी दिले आहे.
आम्ही उद्धव ठाकरेंना भेटायला जायचो तेव्हा ते मास्क लावूनच असायचे. ते कधीच चेहऱ्यावरचा मास्क काढायचे नाहीत. सरकार गेलं आणि त्यांचा मास्क गेला. खुर्ची बरोबर कोरोनाही गेला, अशा शब्दात पालकमंत्री संदीपान भुमरे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.
संदीपान भुमरे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला अंबादास दानवेंनी उत्तर देताना हरामखोर म्हटले होते. कोरोना काळात तुम्हीही काय केलं हे तपासलं पाहिजे. तुम्ही दिवसा काय करत होता आणि रात्री काय करत होता हे काढायला लावू नका, असा इशारा देतानाच दानवेंनी भुमरेंना नमक हरामी आणि हरामखोरीची भाषा करू नये असा दम दिला होता.