पोटनिवडणुकीत थोरात गटाची बाजी, बालेकिल्ल्यात शिवसेनेचा पराभव

काँग्रेसचे राजेंद्र कारभारी वाकचौरे यांना 711 अशा मोठ्या मताधिक्याने विजयी मिळाला. थोरातांच्या मतदारसंघात विखे पाटील शिवसेना आणि भाजपला बळकटी देत असताना थोरातांनी संगमनेरात आपलीच पकड मजबूत असल्याचं या निमित्ताने सिद्ध केलं.

पोटनिवडणुकीत थोरात गटाची बाजी, बालेकिल्ल्यात शिवसेनेचा पराभव
Follow us
| Updated on: Jun 24, 2019 | 5:25 PM

अहमदनगर : काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर शहरवासियांनी पूर्ण विश्‍वास व्यक्त करत शिवसेनेचा पारंपारिक राहिलेला वार्ड क्र.10 मध्ये सुरुंग लावला. काँग्रेसचे राजेंद्र कारभारी वाकचौरे यांना 711 अशा मोठ्या मताधिक्याने विजयी मिळाला. थोरातांच्या मतदारसंघात विखे पाटील शिवसेना आणि भाजपला बळकटी देत असताना थोरातांनी संगमनेरात आपलीच पकड मजबूत असल्याचं या निमित्ताने सिद्ध केलं.

नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखेंनीही लोकसभेत थोरातांना काटशह देण्यासाठी शहर, गाव – वस्ती पिंजून काढली होती. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत विखे – थोरात संघर्ष अधिक वाढत जाणार असल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय.

शिवसेनेचे लखन घोरपडे यांच्या जात वैधतेमुळे रिकाम्या झालेल्या प्र.10 च्या जागेकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. संगमेनर नगरपालिका थोरातांच्या अधिपत्याखाली असून त्यांच्या भगिणी डॉ. दुर्गा तांबे या नगराध्यक्षा आहेत. हा प्रभाग शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला होता. येथे आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे मर्चंन्ट बँकेचे मा.अध्यक्ष राजेंद्र वाकचौरे यांना उमेदवारी दिली होती.

शिवसेना आणि भाजपने ही लढाई मोठी प्रतिष्ठेची केली. मात्र शास्वत विकासाला साथ देताना या प्रभागामधील नागरिकांनी काँग्रेसला मोठं मताधिक्य दिलं. एकूण 2361 मतांपैकी काँग्रेसच्या राजेंद्र वाकचौरे यांना 1352, शिवसेनेच्या कविता तेजी यांना 641,अपक्ष कन्हैय्या कागडे यांना 65, घनश्याम जेधे यांना 252 मते मिळाली. राजेंद्र वाकचौरे यांनी 711 मताधिक्याने दणदणीत विजयी मिळविला.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.