भाजपच्या संपर्कात आहात का? विश्वजीत कदम, सत्यजीत देशमुख म्हणतात…
सांगली : सांगली जिल्ह्यातील काँग्रेसमधील दोन बडे नेते भाजपच्या संपर्कात आहेत. दिग्गज नेते भाजपच्या वाटेवर असल्याने, काँग्रेसला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. यामध्ये काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. विश्वजीत कदम हे काँग्रेसचे माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव […]
सांगली : सांगली जिल्ह्यातील काँग्रेसमधील दोन बडे नेते भाजपच्या संपर्कात आहेत. दिग्गज नेते भाजपच्या वाटेवर असल्याने, काँग्रेसला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. यामध्ये काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. विश्वजीत कदम हे काँग्रेसचे माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांचे सुपुत्र आहेत. त्यांची पक्षप्रवेशाबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली असून या आठ दिवसात, निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
विश्वजीत हे काँग्रेसचे माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांचे पुत्र तर सत्यजित देशमुख हे काँग्रेसचे माजी मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र आहेत. ही दोन्ही बडी घराणी भाजपच्या वाटेवर असल्याने काँग्रेसला सांगलीत भगदाड पडणार असल्याची चर्चा आहे.
काँग्रेसशी एकनिष्ठ, सक्षम नेतृत्व, जनाधार असलेले नेते असूनही काँग्रेस अंतर्गत गटबाजीमुळे आपल्या कारकिर्दीला फटका बसत असल्याची खंत या दोन्ही युवा नेत्यांची आहे. त्यामुळेच विश्वजीत आणि सत्यजीत दोघेही काँग्रेस सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. काँग्रेसमधील गटातटामुळे जिल्ह्यातील, सत्ताकेंद्र हातातून जात असल्याने, जनतेचे प्रश्न सोडवताना अडचणी येत असल्याची भावना या दोघांची आहे.
आमदार विश्वजीत कदम यांनी भाजपात येण्याविषयी यापूर्वी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विश्वजीत यांना खुली ऑफर दिली होती.
पोटनिवडणुकीत विश्वजीत यांचा विजय
दरम्यान, माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनाने सांगलीतील पलूस-कडेगाव या विधानसभेसाठी गेल्या वर्षी पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून विश्वजीत कदम यांना सर्वपक्षीयांनी बिनविरोध निवडून दिलं.
भाजप प्रवेशाचं वृत्त खोटं : विश्वजीत कदम
दरम्यान, “मागील दोन दिवसांपासून काही वृत्तवाहिन्या, वृत्तपत्र आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या भाजप प्रवेशासंदर्भातील बातम्या प्रसारीत होत आहेत. सदरचे वृत्त हे निराधार असून यात कोणतेही तथ्य नाही”, असं आमदार विश्वजीत कदम म्हणाले.
सत्यजीत देशमुख यांनीही वृत्त फेटाळलं
सत्यजीत देशमुख यांनीही भाजप प्रवेशाचं वृत्त फेटाळलं. “भाजप प्रवेशाबाबतचं वृत्त तथ्यहीन आहे. या बातमीने मला धक्का बसला. मी काँग्रेससोबत आहे आणि काँग्रेससोबतच राहीन. कोणीतरी जाणीवपूर्वक याअफवा पसरवत आहे”, सत्यजीत देशमुख यांनी सांगितलं.
Congress Maharashtra MLA Satyajit Deshmukh to ANI on reports that he will join BJP: News is baseless, shocked such news being spread. I am with Congress and will be in Congress only, someone has intentionally spread this rumour to damage my reputation pic.twitter.com/TmsKlOpfIx
— ANI (@ANI) May 29, 2019
कोण आहेत विश्वजीत कदम?
विश्वजीत कदम हे काँग्रेसचे बडे नेते दिवंगत पतंगराव कदम यांचे सुपुत्र आहेत.
पतंगराव कदम यांच्यानंतर भारती विद्यापीठाची धुरा विश्वजीत कदम सांभाळत आहेत
पतंगराव कदम यांच्या निधनानंतर पलूस कडेगावात विधानसभेसाठी पोटनिवडणूक झाली
या पोटनिवडणुकीत काँग्रेसने विश्वजीत कदम यांना उमेदवारी देत, बिनविरोध निवडून आणलं.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत विश्वजीत कदम यांनी पुण्यातून लढत दिली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता.
काँग्रेसचे एकनिष्ठ आणि ज्येष्ठ नेते म्हणून पतंगराव कदम यांचा पक्षात दबदबा होता.
कोण आहेत सत्यजीत देशमुख?
सत्यजित देशमुख हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र आहेत
सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसकडून मंत्रिपद भूषवलं होतं.
सांगली जिल्ह्यात देशमुख कुटुंबाला मानणारा गट आहे.