सांगलीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, पाठलाग करुन धारदार शस्त्राने हल्ला

राष्ट्रवादीचे कुपवाड शहर उपाध्यक्ष आणि लेबर काँट्रॅक्टर दत्तात्रय पाटोळे यांची पाठलाग करुन धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली

सांगलीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, पाठलाग करुन धारदार शस्त्राने हल्ला
Follow us
| Updated on: Jul 10, 2020 | 3:54 PM

सांगली : सांगलीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादीचे कुपवाड शहर उपाध्यक्ष आणि लेबर काँट्रॅक्टर दत्तात्रय पाटोळे यांची पाठलाग करुन धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. (Sangli Kupwad NCP Official Dattatreya Patole Murder)

शुक्रवारी भरदुपारी घडलेल्या या घटनेने सांगली जिल्हा हादरला आहे. कुपवाड एमआयडीसी परिसरात रोहिणी अ‍ॅग्रोटेक कोल्ड स्टोअरेजमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती आहे. पाटोळे गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रवादीच्या कुपवाड शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होते.

दत्तात्रय पाटोळे शुक्रवारी दुपारी दुचाकीवरुन कुपवाडहून सांगली शहराकडे निघाले होते. दुपारी एकच्या सुमारास मिरज औद्योगिक वसाहतीमध्ये रोहिणी कोल्ड स्टोअरेजजवळ त्यांना तिघांनी अडवले. दुचाकी थांबताच हल्लेखोरांनी चाकू, चॉपर आणि कोयत्याने पाटोळे यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.

हेही वाचा : अडीच लाखांची सुपारी, मुक्ताईनगरमधील माजी सभापती हत्या प्रकरणाचा 72 तासात छडा

पाटोळे जीव वाचवण्यासाठी जवळच्याच रोहिणी कोल्ड स्टोअरेजच्या दिशेने पळाले. मात्र हल्लेखोरांनी पाठलाग करुन त्यांना गाठले. त्यानंतर धारदार शस्त्रांनी वार करुन हल्लेखोर पसार झाले.

या घटनेची माहिती मिळताच सांगली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भरदिवसा राजकीय पक्षाच्या पदधिकाऱ्याचा खून झाल्याने सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

काही दिवसांपूर्वी जळगावमधील मुक्ताईनगर पंचायत समितीचे माजी सभापती आणि भाजप नेते डी ओ पाटील यांची पेट्रोलपंप परिसरात गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. अडीच लाख रुपयांची सुपारी देऊन पाटील यांची हत्या केल्याचे उघड झाले होते. हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना 72 तासात यश आले होते.

(Sangli Kupwad NCP Official Dattatreya Patole Murder)

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.