Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगलीच्या महापौर-उपमहापौरांचा राजीनामा, राजीनाम्यानंतर महापौरांना अश्रू अनावर

सांगली महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या महापौर संगिता खोत आणि उपमहापौर धीरज सूर्यवंशी आज (20 जानेवारी) पालिकेच्या महासभेत राजीनामा (sangli mayor deputy mayor resign) दिला.

सांगलीच्या महापौर-उपमहापौरांचा राजीनामा, राजीनाम्यानंतर महापौरांना अश्रू अनावर
Follow us
| Updated on: Jan 20, 2020 | 7:41 PM

सांगली : सांगली महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या महापौर संगिता खोत आणि उपमहापौर धीरज सूर्यवंशी आज (20 जानेवारी) पालिकेच्या महासभेत राजीनामा (sangli mayor deputy mayor resign) दिला. महापालिकेच्या आयुक्तांकडे महापौर आणि उपमहापौर यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खोत आणि सूर्यवंशी यांना याआधीच राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर महापौर आणि उपमहापौरांनी राजीनामा दिला (sangli mayor deputy mayor resign) आहे.

राजीनामा दिल्यानंतर महापौर संगिता खोत यांना अश्रू अनावर झाले. त्या महासभेत बोलताना अचानक रडू लागल्या. संगिता खोत या भाजपच्या सांगली महापालिकेच्या पहिल्या महिला महापौर होत्या. त्यांनी सांगली महापुरावेळी पाण्यात उतरुन काम केलं होतं. सक्षम महिला पदाधिकारी आणि स्वत:चे निर्णय घेणाऱ्या महापौर अशी संगिता खोत यांची ओळख होती.

दरम्यान सांगलीच्या महापौर आणि उपमहापौर सुर्यवंशी यांना चंद्रकांत पाटील यांनी स्वतः फोन करुन आजच्या महापालिकेच्या महासभेत राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. मात्र महापौरांनी आणखी काही दिवसांचा कालावधी देण्याची विनंतीही केली होती. मात्र ही विनंती पक्षाने फेटाळून लावली होती.

महापौरपदासाठी अडीच वर्षांसाठी ओबीसी (OBC) महिला आरक्षण होते. मात्र भाजपने दीड वर्षातच महापौर बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उर्वरित काळासाठी पुन्हा ओबीसी उमेदवाराचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सांगली महापालिका निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला होता. भाजपनं 78 पैकी 41 जागा जिंकल्या (sangli mayor deputy mayor resign) होत्या.

सांगली महापालिका पक्षनिहाय आकडेवारी

भाजप – 41 काँग्रेस – 15 राष्ट्रवादी – 20 इतर – 02

एकूण- 78

VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक.
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं...
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं....
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं.
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका.
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन.
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल.
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल.
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?.
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक.
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?.