Sangli Polictics: सांगलीत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या डायरीवरून नवा वाद, गोपीचंद पडळकर नाराज का?

| Updated on: Jan 02, 2022 | 12:47 PM

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतल्या डायरीमुळे नव्या वर्षात नव्याच वादाला तोंड फुटलंय. या डायरीतून आमदार गोपीचंद पडळकर यांचं नावच वगळण्यात आलंय.

Sangli Polictics: सांगलीत  जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या डायरीवरून नवा वाद, गोपीचंद पडळकर नाराज का?
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक
Follow us on

सांगली: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नवीन वर्ष्याच्या डायरी नुकताच प्रसारित करण्यात आली आहे. या डायरी मध्ये विधान परिषद यादीतून भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचे नाव वगळण्यात आलेचा. हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Sangli District Bank ) डायरीतून आमदार गोपीचंद पडळकर यांचे नाव वगळन्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे गोपचंद पडळकर याचे कार्यकर्ते मध्ये प्रचंड नाराजी असून आता आणखी नव्या वादाला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सुरवात झाल्याचे चित्र सध्या सांगलीत दिसून येत आहे.

गुरुवारी नव्या डायऱ्यांचे संचालकांना वाटप

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०२२ या वर्षाची नवीन डायरी गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रकाशित केली आहे. डायरीमध्ये जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार,बँकेचे संचालक यांची क्रमाने नावे आहेत. जिल्ह्यातील विधान परिषद सदस्यांची देखील यात नावे आहेत. मात्र विधान परिषद सदस्य असलेल्या गोपीचंद पडळकर याचे मात्र या डायरीत नाव नाही.
विधान परिषद सदस्यांच्या यादीतून भाजपचे विधान परिषद सदस्य आमदार गोपीचंद पडळकरांचे नाव वगळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या नवीन डायऱ्यांचे सर्व संचालकांना वाटप केले आहे. संचालकांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या नवीन डायरी दिल्या आहेत . खासदार आणि आमदारांची नावे असताना आ.गोपीचंद पडळकरांचे नाव नसल्याचे दिसून आले.

इतर आमदारांची नावे, पण पडळकरांना वगळले

जिल्हा बँकेच्या वतीने सालाबाद प्रमाणे डायरी काढली जाते. या डायरीमध्ये जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदारांची नावे प्रसिद्ध केली आहेत. मात्र विधान परिषद सदस्यांच्या यादीमध्ये आमदार मोहनशेठ कदम, आमदार अरुण लाड, आमदार सदाशिव खोत यांची नावे आहेत. भाजप आ. गोपीचंद पडळकर यांचे नाव वगळले आहे. यावरून आ.गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत.
सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील आणि आ. गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीची सत्ता आहे. मात्र बँकेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. पालकमंत्री आणि आमदार यांच्यातील वादामुळेच आमदार गोपीचंद पडळकर याचे नाव वगळल्याची चर्चाही सध्या जोरात रंगली आहे.आता आणखी नव्या वादाला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सुरवात झाल्याचे चित्र सध्या सांगली जिल्ह्यात दिसून येत आहे. या वादाचे पडसाद उमटतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

इतर बातम्या-

Beed Election: बीड जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी, मुंडे भावंडांची प्रतिष्ठा

Ankita Patil | हर्षवर्धन पाटलांनंतर नवविवाहित लेकही कोरोनाच्या विळख्यात, अंकिता पाटील कोव्हिड पॉझिटिव्ह