‘तुम्ही नारळ फोडत राहा, उमेदवारी मला मिळो’, विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटलांमध्ये मिश्कील टोलेबाजी

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बजाज यांच्यात ही उमेदवारीची मिश्कील चर्चा रंगली होती. मात्र ही मिश्कील टोलेबाजी भविष्यातील संघर्षाची ठिणगी असल्याची चर्चा सांगलीत ऐकायला मिळत आहे.

'तुम्ही नारळ फोडत राहा, उमेदवारी मला मिळो', विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटलांमध्ये मिश्कील टोलेबाजी
सांगलीत पृथ्वीराज पाटील आणि विशाल पाटील यांची जुगलबंदी
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 10:22 PM

सांगली : सांगली विधानसभेच्या उमेदवारीबाबत काँग्रेसमधील सुप्त संघर्ष आज एका उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसनंही यात उडी घेत यंदा आपली दावेदार असणार असं मिश्कील पणे जाहीर केलं आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बजाज यांच्यात ही उमेदवारीची मिश्कील चर्चा रंगली होती. मात्र ही मिश्कील टोलेबाजी भविष्यातील संघर्षाची ठिणगी असल्याची चर्चा सांगलीत ऐकायला मिळत आहे. (Jugalbandi between Congress leader Vishal Patil and Prithviraj Patil)

विधानसभेची निवडणूक अजून बरीच लांब आहे. मात्र, सांगली विधानसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील सुप्त संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही विधानसभेच्या जागेवरून आक्रमक असेल असं सूतोवाच करण्यात आलं आहे. सांगलीत स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित महापालिकेच्या एका कार्यक्रमात हा सर्व प्रकार पाहायला मिळाला. नेमिनाथ नगर या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या बाल उद्यानाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने जयंत पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे नेते विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्यात ही खुमासदार जुगलबंदी रंगली होती.

दोन पाटलांच्या जुगलबंदीत राष्ट्रवादीचीही उडी आणि एकच हशा!

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नारळ फोडण्यासाठी विशाल पाटील यांना आग्रह केला. मात्र, विशाल पाटलांनी पृथ्वीराज पाटील पहिल्यांदा नारळ फोडतील असं स्पष्ट केल्याने जयंत पाटलांनी पृथ्वीराज पाटील यांना नारळ फोडण्यासाठी सांगितलं. यावेळी पृथ्वीराज पाटील नारळ फोडण्यासाठी पुढे येताच विशाल पाटलांनी सगळे नारळ फोडण्याचे काम पृथ्वीराज बाबांनी करावे आणि ऐनवेळी उमेदवारी व तिकीट आपल्याला मिळो असं मिश्कील वक्तव्य केलं. हे टिप्पणी ऐकून एकच हास्यकल्लोळ सुरू झाला. मात्र पृथ्वीराज पाटील यांनी यावर हजरजबाबीने उत्तर देत ती मिळो पण लोकसभेची मिळो,अशा शब्दात शुभेच्छा दिल्याने पुन्हा एकदा चांगलाच हशा पिकला. काँग्रेस नेत्यांची ही मिश्कील जुगलबंदी संपते तोच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसचा सांगलीच्या जागेवर दावा असणार असं सांगितल्यानं हा हशा बराच काळ टिकला.

विधानसभा उमेदवारीची दावेदारी जोरात

मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी मिळाली होती. असं असलं तरी गेल्या काही वर्षांपासून विशाल पाटील हे सांगली विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. मात्र त्याआधी विशाल पाटील यांना राजकीय उलथा-पालथीमुळे सांगली लोकसभा निवडणूक लढवावी लागली होती. त्यामुळे त्यांना विधानसभा निवडणुकीपासून लांब रहावं लागले होते. मात्र त्यांच्या मनात विधानसभा उमेदवारीची इच्छा कायम असल्याचं दिसून आलं आहे. तर दुसर्‍या बाजूला पृथ्वीराज पाटील यांनी मात्र पुन्हा आपणचं दावेदार असल्याचे स्पष्ट केलंय. त्यामुळे आजची टोलेबाजी उद्याचा संघर्ष बनण्याची चिन्ह दिसून येत आहेत.

इतर बातम्या :

“इथं लोकांना प्यायला पाणी नाही आणि नाव कसं बदलता ?” औरंगाबादच्या नामांतरावरुन इम्तियाज जलील आक्रमक, वाद पुन्हा पेटणार ?

शहिदांच्या कुटुंबीयांचे पाय धुतले, नंतर चांदीच्या ताटात प्रेमाने घास भरवला, बच्चू कडू यांनी साजरा केला स्वातंत्र्यदिन

Jugalbandi between Congress leader Vishal Patil and Prithviraj Patil

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.