Video : मुख्यमंत्री पदावरुन संतोष बांगर अजूनही ‘कन्फ्यूज’, गोंधळलेले बांगर सावरले कसे? वाचा सविस्तर

हिंगोलीचे आमदार संजय बांगर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांची शिवसेना पक्षातील पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. पण हे अनाधिकृत आहे आणि खरी शिवसेना म्हणजे शिंदे गट असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नाही तर शिंदे गटात प्रवेश करुनही अनेक शिवसैनिक हे आपल्या सोबत असल्याचे सांगत त्यांनी मुंबईत शक्तीप्रदर्शन करण्याचे ठरवले होते.

Video : मुख्यमंत्री पदावरुन संतोष बांगर अजूनही 'कन्फ्यूज', गोंधळलेले बांगर सावरले कसे? वाचा सविस्तर
आ. संतोष बांगर
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 5:12 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून (Hingoli) हिंगोलीचे आमदार चांगलेच चर्चेत आले आहेत. शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याच्या त्यांनी शपथा घेतल्या आणि (Rebel MLA) बंडखोरांना शिव्या शाप दिलेले (Sanjay Bangar) संतोष बांगर यांनी बहुमत चाचणी दिवशीच शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर ते कायम चर्चेत राहिलेले आहेत. आता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मतदार संघातून किती समर्थन आहे हे दाखवून देण्यासाठी कार्यकर्त्यांसमवेत मुंबईकडे रवाना होत आहेत. मात्र, दरम्यान जात असतानाच त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच उल्लेख केला. tv9 मराठी शी बोलत असताना संजय बांगर हे चांगेलच गोंधळात पडले. असे असतानाही त्यांनी सावरुन वेळ मारुन नेली. पण बंडखोर आमदारांच्या मनातील मुख्यमंत्री कोण हा प्रश्न कायम राहिलेला आहे.

नेमका प्रसंग काय घडला ?

हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांची शिवसेना पक्षातील पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. पण हे अनाधिकृत आहे आणि खरी शिवसेना म्हणजे शिंदे गट असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नाही तर शिंदे गटात प्रवेश करुनही अनेक शिवसैनिक हे आपल्या सोबत असल्याचे सांगत त्यांनी मुंबईत शक्तीप्रदर्शन करण्याचे ठरवले होते. त्यानुसार ते कार्यकर्त्यांसमवेत मुंबईकडे निघाले असताना ते tv9 मराठी शी संवाद साधत होते. त्याच वेळी कार्यकर्त्यांना घेऊन आपण सन्मानीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मान सन्मान आणि सत्कार कऱण्यासाठी जात असल्याचे बांगर म्हणाले.

अशी केली सावरासावर

सन्मानीय उद्धव ठाकरे हे पूर्वीचे मुख्यमंत्री होते. तर आता मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हे विराजमान झाले आहेत. हा संपूर्ण जन समुदाय हा सन्मानीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहेत. आणि हाच शिवसैनिक मुख्यमंत्र्याचा मान-सन्मान करण्यासाठी मुंबईकडे रवाना होत असल्याचे सांगत यांनी सावरासावर कऱण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाहीतर त्यांच्या कार्यकर्त्यांनीही ही बाब बांगर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांच्याकडून हे पटवून देण्यात आले तरी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा उल्लेख होताच कार्यकर्त्यांनी देखील भूवया उंचावल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

जिल्हा प्रमुख पदावरुन हकालपट्टी

आ. संतोष बांगर यांनी शिंदे गटात सहभागी होत एकनाथ शिंदे याचे व्यक्तिमत्व कसे सरस आहे हे पटवून देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. अखेर त्यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र, आपल्याला पदावरुन कोणीही हटवू शकत नाही. खरी शिवसेना ही शिंदे गटाची आहे. त्यामुळे आपण आपल्या पदावर तर कायम आहोतच पण पदावरुन काढल्याचे कुठलेही पत्र मिळाले नसल्याचे बांगर यांनी सांगितले आहे.

पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.