संजय राठोड यांना टक्कर देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी शोधून काढला तोडीस तोड उमेदवार 

संजय राठोडांना घेरण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पूर्ण रणनीती आखलेय.

संजय राठोड यांना टक्कर देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी शोधून काढला तोडीस तोड उमेदवार 
Follow us
| Updated on: Oct 20, 2022 | 10:54 PM

मुंबई : शिंदे गटाचे मंत्री संजय राठोडांना टक्कर देण्यासाठी, उद्धव ठाकरेंनी तोडीस तोड उमेदवार शोधून काढला आहे. संजय राठोड यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थित शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यवतमाळ जिल्ह्यात संजय राठोड आणि संजय देशमुख हे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. तेच टायमिंग ठाकरे गटानं साधत देशमुखांना आपल्या गटात घेतले आणि आता देशमुखांनीही राठोडांना पराभूत करण्यासाठी चंगच बांधला आहे

संजय देशमुख हे, पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच आहेत. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून देशमुखांनी काम केलं 1999मध्ये शिवसेनेनं तिकीट नाकारल्यानं दिग्रसमधून त्यांनी अपक्ष निवडणूक लढली. त्यावेळी 125 मतांनी राष्ट्रवादीचे उमेदवार ख्वाजा बेग यांचा पराभव करुन पहिल्यांदा आमदार झाले

त्याचवेळी विलासराव देशमुखांच्या सरकारला पाठींबा देत राज्यमंत्रीही झाले. 2004 मध्ये पुन्हा दिग्रस मतदारसंघातून अपक्ष लढत दुसऱ्यांदा आमदार झाले. 2009 मध्ये देशमुख काँग्रेसच्या तिकीटावर लढले पण संजय राठोडांनी त्यांचा 54 हजार मतांनी पराभव केला. 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी संजय देशमुख काँग्रेसमधून भाजपमध्ये आले.

युतीमुळं त्यांना 2019 मध्ये विधानसभेचं तिकीट मिळालं नाही त्यामुळं पुन्हा बंड करत संजय राठोडांच्या विरोधात अपक्ष लढले पुन्हा 2019 मध्ये राठोडांनी संजय देशमुखांना 63 हजार मतांनी पराभूत केलं

आता स्थिती बदलली आहे. शिवसेनेत फूट पडली आहे. त्यामुळं ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडलेत. हीच संधी साधत, संजय देशमुखांनीही 2024ची तयारी करत ठाकरे गटात प्रवेश केला. आणि आता उद्धव ठाकरेंचा दारव्हा इथं मोठा मेळावाही घेणार आहेत

काही दिवसांआधीच पोहरादेवीतले महंत सुनील महाराज ठाकरे गटात आलेत. सुनील महाराजही राठोडांच्या विरोधात गेलेत. तेही निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. त्यामुळं संजय राठोडांच्या विरोधात दिग्रसमधून संजय देशमुख तर दारव्हा मतदारसंघातून सुनिल महाराज लढू शकतात. म्हणजेच संजय राठोडांना घेरण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पूर्ण रणनीती आखली आहे असचं म्हणाव लागेल.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.