प्रकाश आंबेडकरांना हरवणाऱ्या संजय धोत्रेंना मंत्रिपद!
मुंबई : अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना मंत्रिपद निश्चित झालं आहे. संजय धोत्रे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा दुसऱ्यांदा पराभव केला. ते यंदा चौथ्यांदा खासदार आहेत. त्यांना दुपारी पंतप्रधान कार्यालयातून फोन गेल्याने, त्यांचं मंत्रिपद निश्चित झाल्याचं उघड झालं. 1999 ते 2004 पर्यंत प्रकाश आंबेडकर हे खासदार होते. त्यानंतर 2004 ते आतापर्यंत भाजपचे संजय धोत्रे हे […]
मुंबई : अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना मंत्रिपद निश्चित झालं आहे. संजय धोत्रे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा दुसऱ्यांदा पराभव केला. ते यंदा चौथ्यांदा खासदार आहेत. त्यांना दुपारी पंतप्रधान कार्यालयातून फोन गेल्याने, त्यांचं मंत्रिपद निश्चित झाल्याचं उघड झालं. 1999 ते 2004 पर्यंत प्रकाश आंबेडकर हे खासदार होते. त्यानंतर 2004 ते आतापर्यंत भाजपचे संजय धोत्रे हे अकोल्यावर वर्चस्व गाजवत आहेत.
मला अमित शाहांचा फोन आला ते जास्त बोलले नाहीत, फक्त म्हणाले आपको शपथ लेनी है. मला आनंद झाला शेतकाऱ्यांकरिता मी काम करत आलोय, त्यामुळे कृषी मंत्रालय मिळालं तर आनंद होईल – संजय धोत्रे
अकोल्याचे भाजपचे खासदार संजय धोत्रे यांना तीन महिन्यापूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. राज्यभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु होती. मात्र संजय धोत्रे यांचं तिकीट कापण्याच्या तणावातून त्यांना हा हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती होती. तिकीट कापण्याची शक्यता, प्रकाश आंबेडकरांचा पराभव अशा पार्श्वभूमीनंतर संजय धोत्रे यांना मंत्रिपद निश्चित झालं आहे. धोत्रे यांनी यंदा प्रकाश आंबेडकरांचा अडीच लाख मतांनी पराभव केला.
कोण आहेत संजय धोत्रे?
- संजय शामराव धोत्रे हे भाजपचे अकोल्याचे विद्यमान खासदार आहेत. ते या मतदारसंघात चार वेळ निवडून आले आहेत.
- 2004, 2009, 2014 आणि 2019 या चारही लोकसभा निवडणुकीत संजय धोत्रे यांनी विजय मिळवला.
- संजय धोत्रे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांचा अडीच लाख मतांनी पराभव केला
- संजय धोत्रे यांनी 2014 मध्ये त्यांनी अकोला मतदार संघात विजय मिळवला. त्या निवडणुकीत त्यांना 2 लाख 87 हजार मतं मिळाली. त्यांनी प्रकाश आंबेडकरांवर जवळपास 64 हजार मतांनी विजय मिळवला.
- संजय धोत्रे 1999 ते 2004 पर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेवरही निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी थेट लोकसभा लढवली आणि प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवला.
संबंधित बातमी – Akola Lok sabha result 2019 : अकोला लोकसभा मतदारसंघ निकाल
अकोला लकोसभा निवडणुकीतील लढत
अकोला लोकसभा मतदारसंघात यंदा गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा वेगळे चित्र नव्हतं. महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपचे विद्यमान खासदार संजय धोत्रे, भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर आणि आघाडीकडून काँग्रेसचे हिदायत पटेल अशी तिरंगी लढत होती. मात्र ‘बिग फाइट’ ही संजय धोत्रे व प्रकाश आंबेडकर यांच्यातच होती. रिंगणात एकूण सात उमेदवार होते.
अकोला लोकसभा मतदारसंघ राज्यातील एक अतिशय महत्वाचा मतदारसंघ आहे. कारण या ‘मतदारसंघाने राज्याला नेहमीच एक नवा विचार आणि दिशा दिली. 1990 च्या दशकात राज्यभरात गाजलेला प्रकाश आंबेडकर यांच्या ‘अकोला पॅटर्न’ याच जिल्ह्यात जन्माला आलेला. अलिकडे ‘सोशल इंजीनिअरिंग’ हा रूढ झालेला राजकीय विचार याच काळात प्रकाश आंबेडकरांनी अठरा पागड जातींना सोबत घेत यशस्वी करुन दाखविला होता.
1989 मध्ये अकोला जिल्ह्यात भाजपचा शिरकाव झाला. अन पाहता-पाहता या पक्षाने शिवसेनेच्या मदतीने जिल्ह्यात चांगलेच पाय रोवले. 1998 आणि 1999 अशा दोन टर्म प्रकाश आंबेडकरांचा अपवाद वगळता येथून सातत्याने मोठ्या मताधिक्क्याने भाजपचा उमेदवार विजयी होतो आहे. 2014 च्या मोदी लाटेत खासदार संजय धोत्रेंनी तब्बल दोन लाखांवर मतांनी विजय मिळविला होता. तर प्रकाश आंबेडकर या निवडणुकीत थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. खासदार संजय धोत्रे चौथ्यांदा उमेदवारी अर्ज भरला होता. एकेकाळी अकोला लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. येथून माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे, मधुसुदन वैराळे विजयी होत असत. परंतु 1989 नंतर येथे भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले. हा प्रभाव अजून कायम आहे.