संजय राऊत आम्ही 50 एकादिलाचे, तुमचे 15 सांभाळा, शिंदे गटाच्या आमदारानं सुनावलं…

हे सगळे अपात्र होणार, मनसे, प्रहारशिवाय पर्याय नाही, असे म्हणत होते. पण आम्ही सत्तेत आलो... आता कोर्टात जे प्रकरण सुरु आहे, त्यात आम्हीच जिंकू, असं वक्तव्य गायकवाड यांनी केलंय.

संजय राऊत आम्ही 50 एकादिलाचे, तुमचे 15 सांभाळा, शिंदे गटाच्या आमदारानं सुनावलं...
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 02, 2023 | 12:22 PM

मुंबईः आमच्यात टोळीयुद्ध वगैरे काही नाही. आम्ही 50 एकदिलाचे-एकजीवाचे आहोत. तुमचेच उरलेले 15 सांभाळा असा इशारा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देण्यात आलाय. शिंदे गटात सध्या टोळीयुद्ध सुरु आहे. हे सरकार फार काळ टीकणार नाही, असं वक्तव्य राऊत यांनी आज केलं. त्यालाच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी प्रत्युत्तर दिलंय. पुढचे काही दिवस नाही तर 2024 पर्यंत आमचं सरकार राहणार आणि त्यानंतरही आम्हीच निवडून येणार, अशा शब्दात त्यांनी राऊत यांना सुनावलं.

टीव्ही 9 शी बोलताना संजय गायकवाड म्हणावे, ‘ आमच्यात टोळी युद्ध नाही. थोडे-फार समज-गैरसमज सगळीकडेच असतात. संजय राऊतांकडे आता फक्त 15 जण राहिलेत. किती सांभाळता येतील ते सांभाळा. आम्ही 50 एका जीवाचे एका दिलाचे आहोत. आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. 2024 ला आणखी किती येतात, तेही पहा. हे सगळे अपात्र होणार, मनसे, प्रहारशिवाय पर्याय नाही, असे म्हणत होते. पण आम्ही सत्तेत आलो… आता कोर्टात जे प्रकरण सुरु आहे, त्यात आम्हीच जिंकू, असं वक्तव्य गायकवाड यांनी केलंय.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरही संजय राऊत यांनी आज वक्तव्य केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कंटाळवाणं , तेच तेच बोलतात, अशी टीका राऊत यांनी केली. त्यावर संजय गायकवाड यांनी त्यांचा समाचार घेतला.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणात तुमच्यासारखा पांचटपणा नसतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाने जनतेला भुरळ घातली आहे. जे कामाचं आहे, तेच बोलतात.. संजय राऊत यांना चाभरेपणा करण्याची सवय आहे….

त्यांची लायकी आणि मुख्यमंत्र्यांची लायकी यात फरक आहे. सीएम साहेब कामातून बोलतात आणि संजय राऊत यांना काही काम नाही. त्यांच्या जीवनात काही काम उरले नाही, म्हणून ते अशी वक्तव्ये करतात, असंही संजय गायकवाड यांनी सुनावलं आहे.

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.