सचिन पायलट यांचे समर्थन भोवले, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याचे पक्षातून निलंबन
काँग्रेस प्रवक्ते संजय झा यांचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पक्षातून निलंबन केले
मुंबई : राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदावरुन हकालपट्टी झालेले युवा नेते सचिन पायलट यांचे समर्थन करणे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याला चांगलेच महागात पडले आहे. काँग्रेस प्रवक्ते संजय झा यांचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पक्षातून निलंबन केले. (Sanjay Jha suspended from Congress after supporting Sachin Pilot)
पक्षविरोधी कारवाई आणि शिस्तभंग केल्याप्रकरणी संजय झा यांच्यावर काँग्रेसने कारवाई केली आहे. राजस्थानमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ते टीव्हीवरील एका चर्चासत्रात काँग्रेसवरच टीका करताना दिसले.
Shri Sanjay Jha has been suspended from the Congress Party with immediate effect for anti-party activities and breach of discipline. pic.twitter.com/TaT0gWbCc7
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) July 14, 2020
पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन काढून टाकल्यानंतर झा यांनी ट्विट केले होते. ” 2013 ते 2018 ही पाच वर्षे सचिन पायलट यांनी काँग्रेससाठी रक्त, अश्रू, कष्ट आणि घाम दिले. काँग्रेस 21 जागांसारख्या अत्यंत वाईट स्थितीतून 100 वर परत आली. मात्र आम्ही त्यांना नुकताच कामगिरीचा बोनस दिला. आम्ही किती गुणग्राहक आहोत. आम्ही खूप पारदर्शक आहोत.” असे उपरोधिक ट्वीट त्यांनी केले होते. त्यानंतर एका वाहिनीवरील चर्चेत त्यांनी पुन्हा स्वपक्षावर हल्लाबोल चढवला होता.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
For five years Sachin Pilot gave his blood , tears, toil and sweat for the Congress party between 2013-18. The Congress came back from a wretched 21 seats to 100.
We just gave him a performance bonus. We are so meritocratic. We are so transparent.
— Sanjay Jha (@JhaSanjay) July 14, 2020
कोण आहेत संजय झा ?
संजय झा यांच्याकडे 2013 पासून काँग्रेसच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी होती. अनेक चर्चासत्रांमध्ये ते काँग्रेस पक्षाची बाजू मांडत असत. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील अखिल भारतीय व्यावसायिक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
हेही वाचा : अशोक गहलोत जास्त दिवस मुख्यमंत्री राहणार नाहीत, भाजपची प्रतिक्रिया
विकीलीक्सचा हवाला देत 25 एप्रिल 2014 रोजी संजय झा यांनी ट्विटमध्ये दावा केला होता की भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी हे सीआयए एजंट आहेत. स्वामींनी झा यांना कायदेशीर नोटीस बजावली आणि त्यांच्यावर तीन कोटी रुपयांचा दावा दाखल केला होता, त्यानंतर संजय झा यांनी माफी मागितली.
अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे “सर्वात कमकुवत” पंतप्रधान होते, अशी टीका त्यांनी केल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाली होती. इतकंच नव्हे तर काँग्रेसनेही त्यावेळी हात झटकले होते. (Sanjay Jha suspended from Congress after supporting Sachin Pilot)
पहा व्हिडिओ :