शिवसेनेचे तब्बल 45 आमदार आमच्या संपर्कात, खासदार काकडेंचे पुन्हा आकडे
लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी आकड्यांची फेकाफेकी करणारे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे (Sanjay Kakde on Shiv sena) यांनी पुन्हा आकडे फेकले आहेत.
पुणे : लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी आकड्यांची फेकाफेकी करणारे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे (Sanjay Kakde on Shiv sena) यांनी पुन्हा आकडे फेकले आहेत. यावेळी संजय काकडे (Sanjay Kakde on Shiv sena) यांनी शिवसेनेचे तब्बल 45 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा केला.
राष्ट्रवादीमध्ये ज्याप्रमाणे गट तट आहेत, अजित पवार, छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांना मानणारा वर्ग आहे, गट आहेत. त्याप्रमाणेच शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना मानणारे काही आमदार आहेत. ते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्री त्यांचा करा किंवा आमचं करा पण सत्तेत सहभागी करुन घ्या, अशी त्या आमदारांची भूमिका आहे, असं संजय काकडे म्हणाले.
राज्यातील जनतेचा कौल स्वीकारून सत्तेत आलं पाहिजे, शिवसेनाविरोधात असेल असं अजिबात वाटत नाही, असंही संजय काकडे यांनी यावेळी नमूद केलं.
मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांचा जो मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला होतात तोच फॉर्म्युला यंदाही लागू राहील. दोन-चार मंत्रीपदे सेना मागत आहे. शिवसेना 45 आमदारांची इच्छा आहे की भाजप-सेनेची युती हवी, भाजपचा मुख्यमंत्री बसला तरी आमची काही अडचण नाही, असं सेनेच्या या आमदारांचं म्हणणं आहे, असाही दावा संजय काकडे यांनी केला.
यापूर्वीचे अंदाज
संजय काकडे हे प्रत्येक निवडणुकीत आपले अंदाज व्यक्त करत असतात. काकडेंचे आकडे प्रत्येकवेळी चुकले आहेत. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले हे लाख मतांनी हरतील असा अंदाज काकडे यांनी केला होता. मात्र त्यावेळी तो अंदाजही खोटा ठरला होता.
संबंधित बातम्या
उदयनराजेंचा पराभव निश्चित, सुप्रिया सुळे लाखाने हरतील : संजय काकडे