Sanjay Rathod : मातोश्रीची दारं उघडल्यास मी पुन्हा जाईल- संजय राठोड

Matoshree : ...तर मातोश्रीत पुन्हा जाईल- राठोड

Sanjay Rathod :  मातोश्रीची दारं उघडल्यास मी पुन्हा जाईल- संजय राठोड
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 3:25 PM

दिग्रस, यवतमाळ : शिंदे गटाचे आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला. तसंच मातोश्रीचं उघल्यास परत जाण्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. दारव्हा मतदारसंघातील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात संजय राठोड आले होते. त्यांनी यावेळी बंडखोर करण्यामागचं कारण कार्यकर्त्यांशी बोलताना स्पष्ट केलं. संजय राऊतांमुळे (Sanjay Raut) ही वेळ आल्याचे आमदार राठोड यांनी सांगितलं.तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळा जाळून त्यांच्या घरावर दगडफेक केल्यानं हे सर्व गोष्टी घडल्याचं त्यांनी सांगितलं. मातोश्रीचं दार पुन्हा आमच्यासाठी उघडल्यास मी पुन्हा मातोश्रीवर जाईल. उद्धवसाहेबांशी बातचित करेन, असं देखील त्यांनी म्हटलंय. मागच्या काही दिवसात शिवसेनेत झालेलं बंड शिवसैनिकांच्या जिव्हारी लागलं. या सगळ्या नेत्यांनी परत यावं,अशीच भावना सामान्य शिवसैनिकाची होती. संजय राठोड यांचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि आमदारांच्या परतण्याची ही सुरूवात असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

…तर मातोश्रीत पुन्हा जाईल- राठोड

पुन्हा मातोश्रीचं दार आमच्यासाठी उघडल्यास मी पुन्हा जाईल, असं म्हणत राठोड यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या चर्चेची दारं कायम उघडी असल्याचं सांगितलं आहे.

राऊतांमुळेच बंडखोरी करण्याची वेळ

संजय राठोडांनी कार्यकर्त्यांशी बोलताना संजय राऊतांविरोधातला रोष बोलून दाखवला. संजय राऊत नेहमी आक्रमक भाषा वापरतात. त्यामुळे भावना दुखावल्या जातात, त्यांनीच एकनाथ शिंदे यांचा पुतळा जाळायला लावला. त्यांच्या घरावर दगडफेक करायला सांगितली, कार्यकर्ते तर आक्रमक होणारच ना, असं राठोड म्हणालेत.

हे सुद्धा वाचा

ठाकरेंना समजावण्यात यश आलं होतं पण…

उद्धव ठाकरेना समजविण्यात मला आणि गुलाबराव पाटील यांना यश आलं होतं. उद्धव ठाकरे तयारही झाले होते. सुरतला आदित्य ठाकरेंना पाठवायचं म्हणून ठरलं ही होतं. मात्र त्याचवेळी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे विरोधात बोलणं सुरू केलं म्हणून सगळं फिस्कटलं, असा गौप्यस्फोट संजय राठोड यांनी केला आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.