Sanjay Raut Birthday | जितेंद्र आव्हाड, राजीव सातव, अमोल कोल्हेंचं ट्वीट, संजय राऊतांना वाढदिवसाच्या डिजीटल शुभेच्छा

त्यामुळे महाविकासआघाडीतील अनेक नेत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Sanjay Raut Birthday wishes From Political leaders)

Sanjay Raut Birthday | जितेंद्र आव्हाड, राजीव सातव, अमोल कोल्हेंचं ट्वीट, संजय राऊतांना वाढदिवसाच्या डिजीटल शुभेच्छा
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 12:09 PM

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आज  60 वा वाढदिवस आहे. दरवर्षी 15 नोव्हेंबरला राऊत यांचा वाढदिवस मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वत: चा वाढदिवस साजरा करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाविकासआघाडीतील अनेक नेत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Sanjay Raut Birthday wishes From Political leaders)

“शिवसेनेचा आवाज प्रखरपणे सामनाच्या अग्रलेखातून मांडणारे, आपल्या वाग्बाणांनी, तर कधी एखाद्या उर्दू पंक्तीतून समोरच्याच्या वर्मावर बोट ठेवणारे संपादक, खासदार आणि मुख्यतः दिलखुलास व्यक्तिमत्व संजय राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा,” असे ट्वीट काँग्रेस नेते राजीव सातव यांनी केले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी “राजकीय ऊर्ध्वदृष्टी प्राप्त असलेले व राजकीय कुरुक्षेत्रातील कुत्सित विरोधकांना सळो की पळो करून सोडणारे संजय राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा,” असे ट्वीट केले आहे.

या व्यक्तिरिक्त खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, मंत्री धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांनीही संजय राऊतांना शुभेच्छा दिल्या आहेत.

धनंजय मुंडे यांचे ट्वीट

जितेंद्र आव्हाड यांच्याकडून शुभेच्छा 

रोहित पवारांकडून दीर्घायुष्यासाठी प्रार्थना

अमोल कोल्हेंकडून राऊतांना शुभेच्छा 

दरम्यान, राऊत यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या घरी तसेच शिवसेनेच्या मुखपत्राच्या कार्यालयात मोठी रेलचेल असते. मोठमोठ्या राजकीय व्यक्ती त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्याकडे येतात. पण, मी वाढदिवस साजरा केला नाही तरी तुम्हा सर्वांचे प्रेम, शुभेच्छा माझ्यासोबत असतील असं राऊतांनी सांगितले आहे. (Sanjay Raut Birthday wishes From Political leaders)

संबंधित बातम्या :

संजय राऊत वाढदिवस साजरा करणार नाहीत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.