राऊत म्हणाले, शिवसेनाच मोठा भाऊ, दानवे म्हणतात….

| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

मुंबई: संपूर्ण महाराष्ट्रात सध्या चर्चा आहे ती 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकीची. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर 25 वर्षांपासून शिवसेना मोठा भाऊ असल्याचे म्हटलं आहे. तर भाजपकडून युतीचा कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचाही दावा राऊत यांनी केला. दुसरीकडे जालन्यात आम्ही शेवटपर्यंत युतीसाठी प्रयत्न […]

राऊत म्हणाले, शिवसेनाच मोठा भाऊ, दानवे म्हणतात....
Follow us on

मुंबई: संपूर्ण महाराष्ट्रात सध्या चर्चा आहे ती 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकीची. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर 25 वर्षांपासून शिवसेना मोठा भाऊ असल्याचे म्हटलं आहे. तर भाजपकडून युतीचा कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचाही दावा राऊत यांनी केला. दुसरीकडे जालन्यात आम्ही शेवटपर्यंत युतीसाठी प्रयत्न करु, असं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले. युतीचा फॉर्म्युला ठरलेलाच आहे, तशीच युती होईल असं दानवेंनी स्पष्ट केलं. त्यामुळे येत्या निवडणुकीत युतीचं काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

शिवसेना खासदारांची बैठक
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी माहिती दिली. संजय राऊत म्हणाले, “युतीची चर्चा झाली नाही.भाजपकडून कुठलीही ऑफर नाही. आम्ही काहीही स्वीकारलेलं नाही. महाराष्ट्रात आम्हीच मोठे भाऊ आणि आम्हीच दिल्लीचे तख्त गाजवणार. अदृश्य हाताने हातमिळवणी होत नाही”

दरम्यान, आज आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणते मुद्दे मांडायचे यावर चर्चा झाल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. शेतकरी कर्जमाफीसारखे मुद्दे आगामी अधिवेशनात मांडण्याबाबत चर्चा झाली. आयकराचे उत्पन्न 8 लाखापर्यंत करावे अशी मागणी करण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

दानवेंची जालन्यात पत्रकार परिषद

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जालन्यात पत्रकार परिषद घेतली. देशात आणि राज्यात कोणत्याही आघाड्या झाल्या तरी लोकसभेची निवडणूक भाजप जिंकेल, आणि मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, असं रावसाहेब दानवे म्हणाले. राज्यातील 48 पैकी 46 मतदारसंघाचा दौरा केला. भाजपचे पदाधिकारी निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत.

समविचारी पक्षाने एकत्र यावं. मताचे विभाजन टाळावं. शेवटी निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे, असं म्हणत दानवेंनी युतीचा निर्णय शिवसेनेकडे ढकलला.

आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव आला नाही. आम्ही शेवटपर्यंत युतीसाठी हात पुढे करणार. दोघांचे प्रस्ताव एकमेकांकडे येतील, त्यावर बसून निर्णय घेतला जाईल. शिवसेना आमचा जुना मित्र आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून युतीची अपेक्षा करतो, असं दानवे म्हणाले.