Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ममतादीदी बंगालची वाघीण, शिवसेनेचा तृणमूलला पाठिंबा, पश्चिम बंगालच्या मैदानात न उतरण्याची घोषणा

आमच्या मते त्याच खऱ्या बंगाली वाघीण आहेत." अशा आशयाचे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. (Sanjay Raut Mamata Banerjee)

ममतादीदी बंगालची वाघीण, शिवसेनेचा तृणमूलला पाठिंबा, पश्चिम बंगालच्या मैदानात न उतरण्याची घोषणा
संग्रहित फोटो - ममता बॅनर्जी उद्धव ठाकरे भेट
Follow us
| Updated on: Mar 04, 2021 | 1:39 PM

मुंबई : शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या (West Bengal Assembly Election 2021) रिंगणात उतरणार नाही. सेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विटरवरुन यासंबंधी स्पष्टीकरण दिलं आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेसला (TMC) पाठिंबा देत असल्याचं राऊतांनी सांगितलं. ममतादीदी बंगालची वाघीण असल्याचा गौरवही संजय राऊतांनी केला. (Sanjay Raut announces Shiv Sena wont fight West Bengal Assembly Election to support CM Mamata Banerjee)

“शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार की नाही, याविषयी अनेक जणांच्या मनात कुतूहल आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर निर्णय घेण्यात आला. सद्यस्थिती पाहता ही निवडणूक ‘दीदी विरुद्ध सगळे’ अशी होणार आहे. सर्व एम – मनी (पैसा), मसल्स (शक्ती) आणि मीडिया ‘म’मतादीदींच्या विरोधात वापरले जात आहे. त्यामुळे शिवसेनेने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका न लढवता त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही ममता दीदींना गर्जना करणारे यश चिंतीतो. आमच्या मते त्याच खऱ्या बंगाली वाघीण आहेत.” अशा आशयाचे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीतही नशीब आजमावलं

शिवसेनेने याआधी दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतही नशीब आजमावलं आहे. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. परंतु यंदा पश्चिम बंगालच्या मैदानात न उतरण्याचा निर्णय सेनेने घेतला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सलोख्याचे संबंध आहेत. बॅनर्जींनी मुंबई दौऱ्यात ठाकरेंची भेटही घेतली होती.

पश्चिम बंगालची राजकीय स्थिती काय?

पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यात मतदान होणार असून 2 मे रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी 148 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 211 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली होती. तर काँग्रेसला 44, डाव्या पक्षांना 26 आणि भाजपला अवघ्या तीन जागांवर विजय मिळाला होता. (Bengali actress Srabanti Chatterjee joins BJP ahead of West Bengal Assembly Election)

बंगालमधील पक्षीय बलाबल (2016)

तृणमूल काँग्रेस -219 काँग्रेस -23 डावे – 19 भाजप – 16 एकूण – 294

बंगालमध्ये कोणाची सत्ता?

विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्यापासून पश्चिम बंगालच्या राजकारणाकडे सर्वांचे लक्ष आहे. बंगालची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने चांगलीच तयारी केली आहे. मात्र, बंगालमधील जनतेने पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांनाच पसंती दिल्याचे ओपिनयन पोलमधून समोर येत आहे. एबीपी-सीव्होटरच्या ओपिनियन पोलनुसार तृणमूल काँग्रेसला 148-164 जागा मिळू शकतात. तर भाजपला येथे 92 ते 108 जागांवरच समाधान मानावे लागू शकते. पश्चिम बंगालमध्ये काँग्रस आणि डाव्या आघाडीला 31-39 जागा मिळू शकतात.

संबंधित बातम्या :

पेट्रोल-डिझेलची दरवाढ रामराज्यात वावणाऱ्यांना शोभत नाही; संजय राऊतांचा खोचक टोला

बिहारच्या ‘तीळकूटा’चे बंगाली मिठाईशी गूळपीठ? ममता बॅनर्जी-तेजस्वी यादव भेट होणार

(Sanjay Raut announces Shiv Sena wont fight West Bengal Assembly Election to support CM Mamata Banerjee)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.