मुंबई : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde News) बंडानं शिवसेनेला अक्षरशः घाम फोडलाय. पण अजूनही परिस्थिती नियंत्रणात आहे, असा दावा संजय राऊत करताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे शिवसेनेवरच (Shiv sena) दावा ठोकतील, धनुष्यबाण टेक ओव्हर करतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. याचबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला होता. एकनात शिंदे यांच्याकडून शिवसेना पक्षावर दावा ठोकला जाऊ शकतो, किंवा धनुष्यबाण या चिन्हावर कब्जा करण्याची शिंदेची मनिषा आहे, असं बोललं जातंय, त्यावर तुमचं मत काय? असं राऊतांना (Sanjay Raut vs Eknath Shinde) विचारण्यात आलं होतं. त्यावर राऊतांनी ‘करु दे’ असं म्हणत टोला लगावला आहे. त्यांच्या या दोन शब्दांच्या उत्तराचे राजकीय अर्थही काढले जात आहेत.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांची संख्या वाढलीय. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतही शिवसेनेच्या घडामोडींना वेग आलाय. मुंबईत आज पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी या संपूर्ण घडामोडींवर भाष्य केलं आहे. आमदार आणि पक्ष यात फरक आहे, असंही ते म्हणाले. आमदार म्हणजे पक्ष नव्हेत, असं म्हणतानाच राऊतांनी शिंदे यांना टोला लगावलाय.
मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर आता ते मातोश्री इथं पुन्हा राहायला आलेत. त्यानंतर आता आज शिंदे गटातून परतलेले दोन शिवसेना आमदार पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषेदत कैलाश पाटील आणि नितीन देशमुख संबोधित करतील. या पत्रकार परिषदेत, आमदारांना नेमकं कसं घेऊन जाण्यात आलं? याची संपूर्ण कथा सांगितली जाणार असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलंय.
एकनाथ शिंदे यांना शिवसेनावर दावा करण्यासाठी दोन तृतीयांश शिवसेना आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. याचाच अर्थ शिवसेनेच्या 55 पैकी 37 आमदारांचा पाठिंबा मिळाला, तर ते शिवसेनेवर दावा ठोकू शकतात. आपल्यासोबत असलेलीच खरी शिवसेना आहे, असा दावा ते करु शकतात. बुधवार आणि गुरवार या दोन दिवसांत एकनाथ शिंदेच्या गटात सामील होणाऱ्या आमदारांची संख्याही वाढली आहे. काल-परवापर्यंत जे आमदार मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीत होते, ते आमदार अचानक शिंदेसोबत गुवाहाटीत दाखल झालेत. त्यामुळे इकडे मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या समोरची आव्हानंही वाढली आहेत.
एकनाथ शिंदे – 47
भाजप – 106
अपक्ष – 13
एकूण – 166
शिवसेना – 14
राष्ट्रवादी – 53
काँग्रेस – 44
अपक्ष – 10
एकूण – 121