Uddhav Thackeray : राऊतांनी ठाकरेंना विचारलं नक्की काय चुकलं? महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला? उद्धव ठाकरे म्हणतात…

Uddhav Thackeray Interview : या मुलाखतीत संजय राऊत यांनी सर्वात महत्त्वाचा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारला, तो म्हणजे नक्की काय चुकलं आपलं? महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला का? तर त्याला ठाकरे यांनीही त्याच भाषेत उत्तर दिलं आहे.

Uddhav Thackeray : राऊतांनी ठाकरेंना विचारलं नक्की काय चुकलं? महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला? उद्धव ठाकरे म्हणतात...
राऊतांनी ठाकरेंना विचारलं नक्की काय चुकलं? महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला? उद्धव ठाकरे म्हणतात...Image Credit source: saamana
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 7:16 AM

मुंबई : गेल्या एक महिन्यापूर्वी पहाडासारखं मजबूत दिसणारं ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) काही दिवसातच कोसळलं, कारण शिवसेनेतल्या एका बड्यान नेत्यानं बंड केलं. एकनाथ शिंदे यांनी (Cm Eknath Shinde) आपल्यासोबत पन्नास आमदार नेत पत्त्याचा डाव कोसळायला लावावा, तसं ठाकरे सरकार कोसळायला भाग पाडलं. त्यानंतर दोन्ही बाजूंनी टीकेचे बाण चालत राहिले व आरोप प्रत्यारोप होत राहिले. मात्र त्यानंतरच संजय राऊत (Sanjay Raut Uddhav Thackeray Interview) यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली एक वादळी मुलाखत सध्या चर्चेत आहे. या मुलाखतीत संजय राऊत यांनी सर्वात महत्त्वाचा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारला, तो म्हणजे नक्की काय चुकलं आपलं? महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला का? तर त्याला ठाकरे यांनीही त्याच भाषेत उत्तर दिलं आहे.

ठाकरेंचं नेमकं चुकलं काय?

याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, चूक माझी आहे, ते मी माझ्या फेसबुक लाईव्ह मध्ये पहिल्याच सांगितलं आहे, कबूल मी केलं आहे. गुन्हा माझा आहे. तो म्हणजे मी यांना परिवारातला समजून मी यांच्यावरती अंधविश्वास ठेवला. असे उत्तर ठाकरेंनी दिलं.

हे सुद्धा वाचा

ठाकरेंचं मुख्यमंत्री होणं चुकलं का?

त्यावर राऊतांनी प्रश्न केला, तुमचे मुख्यमंत्री होणं चुकलं? त्यावर ठाकरेंनी उत्तर दिलं, यात दोन गोष्टी आहेत, समजा मी त्या वेळेला यांना मुख्यमंत्री केलं असतं. तर यांनी दुसरंच काहीतरी केलं असतं. कारण यांची भूकच भागत नाहीये. यांना मुख्यमंत्री पदही हवं आहे आणि यांना शिवसेना पक्षप्रमुख ही व्हायचं आहे. हे शिवसेना पक्षप्रमुखांसोबत यांची तुलना करत आहेत, ही राक्षसी महत्वकांक्षा आहे, त्याला हाव म्हणतात. एक दिलं की तुझं तेही माझं, माझं तेही माझं, याचं तेही माझं, इथपर्यंत यांची हाव गेलेली आहे. या हावरटपणांना सीमा नसते, असा घणाघात ठाकरेंनी केला.

महाविकास आघाडीचा प्रयोग फसला का?

यावर पुन्हा राऊतांनी प्रश्न केला,महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला का? त्यावर ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला असता तर लोकांनी उठाव केला असता. तसं झालं नाही, जनता ही आनंद होती, कारण सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना पहिल्यांदा कर्जमुक्त केलं होतं, त्याच्यानंतर कोरोना काळात मी अभिमानाने सांगेल संपूर्ण माझ्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी उत्तम सहकार्य केलं, म्हणूनच ज्या पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझं नाव आलं ते जनतेचा प्रतिनिधी म्हणून ते नाव आलं होतं. जर समजा यांनी सहकार्य केलं नसतं तर कोण होतो? मी मी एकटा काय करणार होतो? असा प्रतिसवाल उद्धव ठाकरेंनी केला.

घराबाहेर न पडण्यावरही स्पष्टीकरण

यावेळी ठाकरेंनी त्यांच्या घराबाहेर न पडण्याच्या टीकेलाही उत्तर दिलं आहे, मी घराबाहेर पडत नव्हतो, घराबाहेर पडायचं नाही हेही मी लोकांना सांगत होतो. घराबाहेर न पडता सुद्धा देशातल्या सर्वोत्तम पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझं नाव का आलं? कारण त्या वेळेला परिस्थिती तशी होती. मी स्वतः सांगत होतो घराबाहेर पडू नका आणि लोक ऐकत होती. मी आजही घराबाहेर पडलो तर शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने गर्दी होतेच, मग काय झालं असतं? लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण, तेव्हा ती काळाची गरज होती, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.