शरद पवार कुटुंबातील प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम, पार्थबाबत मी काय बोलणार? : संजय राऊत

| Updated on: Aug 14, 2020 | 2:21 PM

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्याचे नातू पार्थ पवार यांच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली (Sanjay Raut on Sharad Pawar Parth Pawar issue).

शरद पवार कुटुंबातील प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम, पार्थबाबत मी काय बोलणार? : संजय राऊत
Follow us on

मुंबई : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्याचे नातू पार्थ पवार यांच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली (Sanjay Raut on Sharad Pawar Parth Pawar issue). “शरद पवार कुटुंबातील प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहेत. यावरुन इतरांच्या जीवाची लगेच घालमेल होण्याचं काही कारण नाही. त्यांनी चिंता करु नये. हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, त्यांनाच पाहू द्या”, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

संजय राऊत म्हणाले, “दुसऱ्या पक्षातील प्रमुख लोकांना सल्ला देण्याचं काम माझं नाही. सामना एक वृत्तपत्र आहे. आजूबाजूला ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यावर भाष्य करायचं काम मी करत असतो. काल एक प्रकार घडला. तो मीडियाने घडवला, याच्या पलिकडे त्याला महत्त्व नाही.”

“खरंतर तो विषय राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षांतर्गत विषय आहे. तो शरद पवार यांच्या कुटुंबातील अत्यंत अंतर्गत विषय आहे. त्याच्यावर बाहेरच्यांनी बोलू नये. मला वाटतं पवार कुटुंब आणि त्यांचा पक्ष हे त्याविषयी चर्चा करण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी सक्षम आहेत. त्याविषयावर त्या पक्षाचेच प्रवक्ते बोलतील. पवार कुटुंबातील कुणीतरी बोलतील, मी कशासाठी बोलावं?”  असं संजय राऊत म्हणाले.

“बाळासाहेब ठाकरे देखील आम्हाला जाहीरपणे फटकारायचे”

संजय राऊत यांना त्यांच्या सामना संपादकीयमधील भूमिकेविषयी विचारले असते ते म्हणाले, “मी संपादकीयमध्ये हेच लिहिलं आहे की एखादा पक्ष असतो तो एक कुटुंब असतो. जसं बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष चालवला, तसेच शरद पवार पक्ष चालवत आहेत. मुलायसिंग यादव हे एक उदाहरण झालं. हे सर्व कुटुंबं आहेत. त्या कुटुंबाच्या प्रमुखानं तरुण कार्यकर्त्यांविषयी एखादं मत व्यक्त केलं तर आमच्यासारख्या लोकांनी ते मत आशिर्वाद म्हणून स्वीकारलं आहे. बाळासाहेब ठाकरे देखील आम्हाला जाहीरपणे फटकारायचे. आम्ही त्यातूनच शिकत गेलो. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण होते. त्यांनी देखील महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना जाहीरपणे मार्गदर्शन केलंय.”

Parth Pawar | पार्थ पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, ‘ऑपरेशन लोटस’ची सुरुवात पवारांच्या घरातून?

“मुलायमसिंग यादव यांनी त्यांच्या कुटुंबात वाद झाले तेव्हा अनेकदा काही भूमिका मांडल्या आहेत. अटलबिहारी वाजपेयी, आडवाणी, अगदी नरेंद्र मोदी असतील त्यांनी सुद्धा जाहीररित्या तरुण कार्यकर्त्यांना कठोर आणि कटू शब्दात मार्गदर्शन केलंय, सूचना केल्या आहेत. त्या तेवढ्यापुरत्याच मर्यादित असतात. मला वाटतं शरद पवार यांनी देखील त्या भूमिकेतूनच काही मतं मांडली असतील तर इतरांच्या जीवाची लगेच घालमेल होण्याचं काही कारण नाही. त्यांनी चिंता करु नये. हा त्यांचा अंतर्गत विषय आहे त्यांनाच पाहू द्या,” असंही संजय राऊत म्हणाले.

“पार्थ पवार नाराज आहेत की नाही हे तुम्ही आम्ही कोण ठरवणार? हे त्यांचे घरातील आई वडिल ठरवतील. त्यांचे आजोबा ठरवतील. त्यांच्या पक्षाचे लोक ठरवतील. पार्थ पवार यांनी अगदी सुरुवातीला काही मागणी केली असती तर ते समजू शकलो असतो. मात्र, दोन महिन्यांनी त्यांच्या पत्राचा ढोल वाजवून वापर केला जातोय हे चुकीचं आहे.

नया है वह, पार्थ पवारांबाबतचा प्रश्न छगन भुजबळांनी टोलावला

“देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बिहारच्या निवडणुकीची जबाबदारी याचं मला कौतुक”

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बिहारच्या निवडणुकीची जबाबदारी दिल्याबद्दल त्याचं मला कौतुक असल्याचं मत व्यक्त केलं. तसेच त्याच्याकडे सकारात्मकपणे पाहावे, असंही म्हटलं.

संबंधित व्हिडीओ :


Sanjay Raut on Sharad Pawar Parth Pawar issue