Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राठोड यांच्यावर शरद पवार नाराज?, संजय राऊत म्हणतात…

शरद पवार संजय राठोड यांच्यावर नाराज आहेत, अशी कुठलीही माहिती माझ्याजवळ नाही. अशा चर्चा माध्यमांमध्ये होत असतात, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली. | Sanjay Raut

संजय राठोड यांच्यावर शरद पवार नाराज?, संजय राऊत म्हणतात...
संजय राठोड, शरद पवार आणि संजय राऊत
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 10:48 AM

मुंबई :   वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या समर्थकांनी वाशिममधील पोहरादेवी गडावर (Pohradevi crowd) गर्दी केली होती. या शक्तिप्रदर्शनाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) नाराज असल्याची माहिती आहे. यावरच शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारलं असा मला यासंदर्भात कुठलीही माहित नाही, असं ते म्हणाले. (Sanjay Raut Comment on Sharad pawar Upset over Sanjay Rathod pohradevi Gathering)

शरद पवार संजय राठोड यांच्यावर नाराज आहेत, अशी कुठलीही माहिती माझ्याजवळ नाही. अशा चर्चा माध्यमांमध्ये होत असतात, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली. संजय राऊत बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना पोहरादेवी येथे संजय राठोड यांच्या समर्थनासाठी झालेल्या गर्दीविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर संजय राऊत यांनी संबंधितांवर कठोर कारवाई होईल, असे सांगितले.

पोहरादेवीत नियमांचे उल्लंघन झाले आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. उद्धव ठाकरे हे कायद्याची आणि नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करतात. ते आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडणार नाहीत. त्यामुळे याप्रकरणात राज्य सरकारकडून कायद्याचे पालन केले जाईल, असे संजय राऊत यांनी म्हटले. तर संजय राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनावर मुख्यमंत्री आणि शरद पवार नाराज आहेत का, याबाबत बोलण्यास राऊत यांनी नकार दिला.

शरद पवार नाराज?

वनमंत्री संजयं राठोड यांच्या समर्थकांनी वाशिममधील पोहरादेवी गडावर (Pohradevi crowd) संजय राठोड यांना पाठिंबा देण्यासाठी कोरोनाचे सगळे नियम पायदळी तुडवून गर्दी केली होती. एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच संपूर्ण प्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे राज्यातला एक मंत्रीच अश्या प्रकरची गर्दी जमवत असेल तर ते सरकारच्या प्रतिभेला शोभत नाही, याचमुळे पवार नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश

शरद पवार यांच्या नाराजीवर संजय राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर त्याचं पालन होणं गरजेचं आहे मात्र जी गर्दी झाली त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री कायद्याच्या बाबतीत सगळ्यांशी सारखेच वागतात. कायदा सगळ्यासाठी सारखा आहे. सरकार आणि प्रशासन योग्य ती कारवाई करेल”

(Sanjay Raut Comment on Sharad pawar Upset over Sanjay Rathod pohradevi Gathering)

हे ही वाचा :

संजय राठोडांच्या शक्तिप्रदर्शनावर शरद पवार नाराज?

नियम मोडला तर उद्धव ठाकरे आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत: संजय राऊत

बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण.
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप.
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार.
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप.
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड.
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश.
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू.
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...