काही लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने दुकानं चालवून संसदेत जातात, राऊतांचा आठवलेंवर अप्रत्यक्ष निशाणा
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रमुख आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर अप्रत्यक्ष जोरदार निशाणा साधलाय.
औरंगाबाद : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रमुख आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर अप्रत्यक्ष जोरदार निशाणा साधलाय. काही लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने दुकानं चालवतात. तसेच त्यांच्याच नावाने संसदेत जातात, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. ते औरंगाबादमधील जय भीम फेस्टिव्हलमध्ये आयोजित मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलत होते. प्रसिद्ध राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांनी ही मुलाखत घेतली (Sanjay Raut criticize Ramdas Athawale in Aurangabad).
संजय राऊत म्हणाले, “बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिशा दिली. काही लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने दुकानं चालवतात. त्यांच्या नावानं संसदेत जातात. देशात दोनच दैवतं आहेत, एक बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे छत्रपती शिवाजी महाराज. आज देशात विचार आणि माणूस संपवण्याचं काम केलं जातं आहे. त्याचे गंभीर परिणाम देशाला भोगावे लागतील. संविधानावर हल्ला होत आहे. स्वातंत्र्य संपत चालले आहे. आता जनता शांत आहे, मात्र 2024 ला जनतेच्या भावनांचा स्फोट झालेला असेल. जगात कोणीही सत्तेचा अमर पट्टा बांधून आला आहे. सद्दाम हुसेन, ट्रम्प पण हरले.”
“मी उद्धव ठाकरे यांना नेहमी म्हणतो तुम्ही दिल्लीत गेले पाहिजे. देशात सध्या नेते दिसत नाही. राहुल गांधी एक प्रामाणिक नेता आहे. सत्तेची ताकद आणि पैसा राहुल गांधींचं खच्चीकरण करण्यासाठी वापरला जातोय. राहुल गांधींपेक्षा अनेक बोगस लोक आहेत. काँग्रेस फोडले जात आहे. काँग्रेस नेत्यांनी गांधी आणि काँग्रेसच्या नावावर कोट्यावधी रुपये जमवले. त्यामुळे ते घाबरत आहेत,” असंही संजय राऊत यांनी आपल्या मुलाखतीत नमूद केलं. तसेच राज्यकर्ता दिलदार असला पाहिजे असंही ते म्हणाले.
संजय राऊत यांनी यावेळी ईडीवरही निशाणा साधला. ते म्हणाले, “ईडीचे काम बेहिशोबी पैसा बाहेर काढणे हे आहे. काळा पैसा बाहेर काढू असं भाजप म्हणालं होतं. 7 वर्षात काय केलं? मोदींचे माझे चांगले संबंध आहेत. महाराष्ट्र सरकार गेल्याने माझ्या मागे ईडी लावली. बायकांना नोटीस देता आम्हाला द्याना.”
“मुंबईत झालेल्या खासदाराच्या आत्महत्येत भाजपच्या लोकांची नावं”
संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत. ते म्हणाले, “आम्ही जनतेचा आवाज ऐकतो. खरंतर त्यांनी राजीनामा देण्याची गरज नव्हती, पण तरीही राजीनामा घेतला. यात काळात मोहन देलकर या खासदारांनी आत्महत्या केली. त्यांना वाटलं असेल मुंबईत आत्महत्या केल्यानं त्याचा तपास होईल. त्यांच्या आत्महत्येमागे गुढ आहे. त्यांच्या आत्महत्येला आम्ही न्याय देऊ. त्यांचा महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्वास होता. त्यामध्ये ज्या लोकांची नावं आहेत त्यामध्ये भाजपच्या लोकांची नावं आहेत.”
केंद्रात दोन-चार लोकं सोडले तर बाकी दिल्ली मूक आणि बधीर आहे. ज्या पक्षाचे सरकार आहे त्यांच्या लोकांना बोलण्याचा अधिकार नाही. दिल्ली आता मुडद्यांचं शहर झालंय, असाही प्रहार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केली.
मुलाखतीतील इतर महत्त्वाचे मुद्दे
- सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. एक ही पक्ष किंवा आमदार कुठे जाणार नाही.
- राजपाल कोश्यारी यांना वाटतं त्यांच्या विचाराचं सरकार यावं. त्यांनी पहाटे आणलं होतं. सरकारने राज्यपाल नियुक्तीसाठी 12 नावं पाठवली आहेत ती अद्याप मंजूर नाही.
- एनडीए सध्या अस्तित्वात नाही, तशी यूपीएही नाही. यूपीएचं पुनर्गठन झालं पहिजे. त्याचे नेतृत्व शरद पवार यांनी करावे. त्यामध्ये सर्व पक्ष येतील.
- पंतप्रधान पदावरील व्यक्तीने एका स्टेडियमला आपलं नाव देण्याचं कृत्य करायला नको होतं.
- काँग्रेसने मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे. त्यांनी जर त्याग केला तर देशातील चित्र बदलेल.
- दिल्लीत नवी संसद उभी राहते. त्या संसदेत नेहरू ते मोदीपर्यंतचे पाय लागले. ती संसद बंद केली जाईल. या देशात सध्या काहीही होऊ शकतं.
हेही वाचा :
राठोडांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
मुख्यमंत्री कुणाच्या दबावाला बळी पडत नाही, वेट अँन्ड वॉच : संजय राऊत
आता कोणत्याही क्षणी संजय राठोड यांची विकेट, संजय राऊत यांचे सूचक ट्विट
व्हिडीओ पाहा :
Sanjay Raut criticize Ramdas Athawale in Aurangabad