‘नारायण राणे पादरा पावटा’.. राऊतांच्या तोंडी बाळासाहेबांचे शब्द, म्हणाले आता नागडाच करतो….

नारायण राणेंना इशारा देताना राऊत म्हणाले, ' तो बोलत राहिला तर पूर्ण नागडा करीन. तू ये. मैदानात... हिंमत आहे तर फिर एकटा....

'नारायण राणे पादरा पावटा'.. राऊतांच्या तोंडी बाळासाहेबांचे शब्द, म्हणाले आता नागडाच करतो....
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 2:52 PM

मुंबईः नारायण राणे (Narayan Rane) विरुद्ध संजय राऊत वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तर आता याबाबातीत माझा संयम संपला आहे. नारायण राणे आणि त्यांच्या दोन मुलांना आता मी नागडाच करतो. त्यांची सगळी प्रकरणं उद्या बाहेर काढतो, असं वक्तव्य करत संजय राऊतांना बाळासाहेब ठाकरे यांचे शब्द वापरले. नारायण राणे पदरा पावटा आहे, याला कोण घाबरतो, असा सवाल राऊतांनी केला. संजय राऊत मुंबईतून नाशिकच्या दौऱ्यासाठी आज निघाले. तत्पुर्वी त्यांनी नारायण राणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत म्हणाले, ‘ कालपर्यंत मी त्याला आदरार्थी संबोधत होतो. पण त्याने आरेतुरेची भाषा वापरली.  सगळ्यांना आरे तुरे करतो. मुख्यमंत्र्यांना आरेतुरे… मोदींना आरेतुरे.. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, फडणवीस, अहमद पटेल, सोनिया गांधी, मोदी सगळ्यांना आरे तुरे करतो….

किरीट सोमय्या यांनी नारायण राणेंवर जे आरोप केले, ते उत्तर दिले का? १०० बोगस कंपन्या आणि इतर सगळी प्रकरणं बाहेर काढतो, असा इशारा राऊतांनी दिला.

नारायण राणेंवर टीका करताना संजय राऊत म्हणाले, ‘ नारायण राणे, माझ्या नादाला लागू नकोस. कालपर्यंत गप्प होतो. आज तू मर्यादा सोडली आहेस. नामर्द माणूस आहेस. ईडी आणि सीबीआयच्या भीतीनं पळाला आहे..

तो वेड्यांच्या कळपात आहे. शिंदे गटाच्या माणसाचं सामन करण्यासाठी नारायण राणेंचं मंत्रिपद जातंय म्हणून तो भैसाटलाय, अशा शब्दात संजय राऊत यांनी नारायण राणेंची कान उघडणी केली.

‘…. तर नागडा करीन’

नारायण राणेंना इशारा देताना राऊत म्हणाले, ‘ तो बोलत राहिला तर पूर्ण नागडा करीन. तू ये. मैदानात… हिंमत आहे तर फिर एकटा. केंद्राची सुरक्षा काढून टाक… असा इशारा राऊत यांनी दिलाय….

नारायण राणे काय म्हणाले?

सिंधुदुर्गातील एका कार्यक्रमात बोलताना नारायण राणे यांनी संजय राऊतांना इशारा दिला. २६ डिसेंबर रोजी राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखात राणे यांच्याविरोधात मानहानीविषयक मजकूर प्रकाशित केल्याचा आरोप राणेंनी केलाय. हा अग्रलेख मी जपून ठेवला असून तो वकिलांनाही पाठवल्याचा इशारा राणे यांनी दिलाय.

‘नितेश राणेंची बुद्धी टिल्ली’

संजय राऊतांनी नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणेंवरही हल्लाबोल केला. नितेश राणेंचा उल्लेख अजित पवार यांनी टिल्लू असा केला. यावर राऊत म्हणाले, ते नुसते शरीरयष्टीनेच टिल्ले नाहीत, त्यांची बुद्धीच टिल्ली आहे.

राऊतांविरोधात अजामीनपात्र वॉरंट

मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्या प्रकरणी संजय राऊत यांना आज अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला. यावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली. ही फार मोठी गोष्ट नाहीये. ट्रॅफिकमुळे मी कोर्टात पोहोचू शकलो नाही. त्यामुळे वकिलांना मी याप्रकरणी ताबडतोब प्रक्रिया करण्यास सांगितलं आहे, असं राऊत म्हणाले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.