मुंबई : शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याशी संबंधित लोकांवर आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. परब यांच्या सीएच्या घरीही आयकर विभागाने छापा टाकलाय. अशावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना भवनात दुसरी पत्रकार परिषद घेत भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर (Central Investigation Agency) गंभीर आरोप करत जोरदार हल्ला चढवलाय. अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडी किंवा आयकर विभागाच्या धाडी केवळ महाविकास आघाडीच्या नेत्यांवरच का? असा सवाल करत भाजपचे लोक काय मुंबईतील रस्त्यावर हातात कटोरा घेऊन भीक मागतात का? अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय.
Why’re central agencies targetting a selected few from states like West Bengal and Maharashtra…don’t they get anybody else from other states, it’s a tactic to pressurise & destablise MVA govt: Shiv Sena leader Sanjay Raut on raids on party’s close aides pic.twitter.com/wnjARrIOBu
— ANI (@ANI) March 8, 2022
संजय राऊत म्हणाले की, आज मुंबईत मोठी हालचाल आहे. धाडीवर धाडी पडत आहेत. त्यासाठी तुम्हालाही मोठं काम आहे. आम्ही विचार केला आम्हीही एक धाड टाकावी. आम्हालाही अधिकार आहे. मुंबईत घुसण्याचा घुसवण्याचा शिवसेनेलाही अधिकार आहे. आमच्या काही कार्यकर्त्यांवर ईडी नाही आता आयटीची रेड सुरु आहे. आयटीची भानामती चालू आहे. मला वाटतं की महापालिका निवडणुका होत नाहीत तोवर प्रत्येक वार्ड, शाखेत रेड पडतील. त्यांना आता एकच काम उरलं आहे. जिथे जिथे शिवसेना तिथे रेड टाकण्याचं काम त्यांच्याकडे आहे’, असा टोला राऊत यांनी ईडी आणि आयटीला लगावलाय.
देशात सध्या हा एकच प्रश्न आहे की फक्त महाराष्ट्र आणि बंगालमध्ये ठराविक लोकांना का टार्गेट केलं जात आहे. या देशात अन्य राज्यात कुणी मिळत नाही का? फक्त शिवसेना किंवा टीएमसीच… हे सरकारवर दबाव टाकून सरकार पाडण्याचा घाट आहे. आयटी आणि ईडीला आम्ही आतापर्यंत 50 नावं पाठवली आहेत. पण ईडी किंवा आयटीला एक जबाबदार खासदार बोलतोय तर त्याबाबत चौकशी व्हावी असं त्यांना का वाटत नाही?, असा सवाल त्यांनी विचारलाय.
किरीट सोमय्या यांनी एका केंद्रीय मंत्र्याबाबत 100 बोगस कंपन्यांची यादी दिलीय. कुणी ढवंगाळे आहेत, ते भाजपच्या जवळ आहेत. त्यांच्या 75 बोगस कंपन्यांची यादी मी पाठवली आहे. त्याचं काय झालं? ईडीच्या सर्वाधिक कारवाई महाराष्ट्रात झालीय. आतापर्यंत महाविकास आघाडीच्या 14 लोकांवर कारवाई झालीय. भाजपच्या लोकांवर आयटी किंवा ईडीची रेड का नाही? ते लोक काय रस्त्यावर कटोरा घेऊन भीक मागत आहेत का? अशी खोचक टीका संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर केलीय.
इतर बातम्या :