Kirit Somaiya INS Vikrant Case : ईडीपेक्षा आमचे पोलीस अधिक सक्षम, सोमय्यांच्या चार दिवसाच्या चौकशीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
आयएनएस विक्रांत प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स बजावण्यात आल्यानंतर आज किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आर्थिक गुन्हे विभागात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. त्यांची सलग चार दिवस चौकशी करण्यात येणार आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आयएनएस विक्रांत (INS Vikrant) बचाव मोहीमेत भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. त्यानंतर सोमय्यांवर गुन्हा देखील दाखल झाला होता. आयएनएस विक्रांत प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स बजावण्यात आल्यानंतर आज किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आर्थिक गुन्हे विभागात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. त्यांची सलग चार दिवस चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान या प्रकरणावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ईडीपेक्षा आमचे पोलीस अधिक सक्षम असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच हा पोलीस तपासाचा भाग असून, पोलीस या प्रकरणातील सत्य शोधून काढतीलच. ते ईडीपेक्षा अधिक चांगला तपास करतात असे राऊत यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
आयएनएस विक्रांत बचाव मोहीमेत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. त्यानंतर सोमय्यांवर गुन्हा देखील दाखल झाला. आयएनएस विक्रांत प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स पाठवण्यात आले होते, मात्र समन्स पाठवूनही चौकशीसाठी हजर न राहिल्याने सोमय्या यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून दुसऱ्यांदा समन्स पावठण्यात आले. तसेच चौकशीसाठी हजर न राहिल्यास फरार घोषित करू असा इशारा देखील देण्यात आला होता. त्यामुळे आता सोमय्या यांना चौकशीसाठी हजर राहवे लागणार आहे.
राज ठाकरेंवर निसाणा
राज ठाकरे हे आयोध्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत, त्यापूर्वी ते औरंगाबादमध्ये सभा देखील घेणार आहेत. यावरून संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आयोध्याचे आणि शिवसेनेचे नाते राजकीय नसून, ते फार जुने असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आयोध्याला ज्याला जायचे त्याने जावे असे राऊत यांनी म्हटले आहे. तसेच मराठवाड्यातील जनता कायम शिवसेनेच्या पाठिमागे होती आणि असेल तिथे कोणाला सभा घ्यायची ते घेऊद्या असे देखील राऊत यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता म्हटले आहे.
संबंधित बातम्या
दिलासादायक! पंतप्रधान मोदींच्या काळात गरीबीचे प्रमाण कमी होण्याचा दर वाढला; जागतिक बँकेची माहिती
Maruti Suzuki: SUV कार बाजारात पुन्हा दमदार एन्ट्रीसाठी मारुतीची टोयोटाला साद
Today petrol, diesel rates : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर जाहीर, पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर